रितेशच्या स्टाईलनं कल्ला! काही तासांत सुरू होणार 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:14 IST2024-07-28T15:13:11+5:302024-07-28T15:14:26+5:30
काही वेळातच सुरू होणार मजा-मस्ती, धमाल, राडा अन् कल्ला...

रितेशच्या स्टाईलनं कल्ला! काही तासांत सुरू होणार 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere
Bigg Boss Marathi Season 5 : नव्या रुपात, नव्या ढंगात 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वाचा होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहे. यंदाच्या पर्वामधील स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी फक्त काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता अवघ्या काही तासांत 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere होणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात लयभारी होस्ट म्हणून रितेशची ग्रँड एन्ट्री होणार आहे. भन्नाट स्पर्धकांसोबत कल्ला करण्यासाठी रितेश सज्ज आहे. अवघ्या काही तासांत 'बिग बॉस मराठी'च्या घराचा दरवाजा उघडला जाणार आहे. काही वेळातच मजा-मस्ती, धमाल, राडा अन् कल्ला होणार आहे. 100 दिवसांचा हा मनोरंजनाचा खजिना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere आज 28 जुलैला म्हणजेच आज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर पाहता येणार आहे. या सोहळ्यात यंदा शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याचा उलगडा होणार आहे. हा पाचवा सीझन प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी वाहिनी'वर व 'जिओ सिनेमा'वर पाहता येईल.
पहिला इंडियन आयडल गायक अभिजित सावंत, बोल्ड अभिनेत्री निक्की तांबोळी, शुभंकर तावडे आणि संजू राठोड हे बिग बॉसच्या घरात जात असल्याचं प्रोमो पाहून म्हटलं जात आहे. स्पर्धक म्हणून अनेक कलाकरांची नावं चर्चेत असली तरी अद्याप एकही नाव अधिकृतपणे जाहीर झालं नाहीये. आता नवा सीझन आणि नवा होस्ट यामुळे पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'ची जास्तच चर्चा होताना दिसतेय.