Rinku Rajguru : मोठ्या पडद्यानंतर रिंकू राजगुरूची छोट्या पडद्यावर एन्ट्री; पाहा, नव्या शोचा नवा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:14 IST2022-07-08T14:09:37+5:302022-07-08T14:14:40+5:30
Rinku Rajguru : ‘सैराट’मधील आर्ची साकारून रिंकू राजगुरूने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत ती दिसली. काही वेबसीरिजमध्ये’सुद्धा झळकली. आता रिंकू छोट्या पडद्यावरही दिसणार आहे...

Rinku Rajguru : मोठ्या पडद्यानंतर रिंकू राजगुरूची छोट्या पडद्यावर एन्ट्री; पाहा, नव्या शोचा नवा प्रोमो
‘सैराट’ या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारून सबंध महाराष्ट्राला याड लावणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru ) आता मोठी स्टार झाली आहे. ‘सैराट’मधील आर्ची साकारून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत ती दिसली. काही वेबसीरिजमध्ये’सुद्धा झळकली. आता रिंकू छोट्या पडद्यावरही दिसणार आहे. होय, सेलिब्रिटी या नात्याने एका आगामी शोमध्ये ती सहभागी होणार आहे.
हा शो कोणता तर ‘बस बाई बस’. होय, सुबोध भावे (Subodh Bhave) खास महिलांसाठी लेडिज स्पेशल बस घेऊन येतोय. ही लेडिज स्पेशल म्हणजेच,‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) हा शो. या शोमध्ये आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हजेरी लावणार आहे.
रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा प्रोमो शेअर केला आहे. यात लेडिज स्पेशल बसमध्ये चढलेली दिसते आणि या बसमधील महिला प्रवाशांनी तिच्या प्रश्नांचा नुसता मारा चालवला आहे. रिअल लाईफमध्ये तू खरंच कधी कुणाच्या कानाखाली वाजवलीस का? सैराटच्या वेळी तू दहावीत होतीस मग आता कितवीत आहेस? कोणला मराठीत सांगितलेलं कळत नाही तर तू खरंच इंग्लिशमध्ये सांगतेस का गं? तुला बॉयफ्रेन्ड आहे का? असे एक ना अनेक प्रश्न महिना विचारत आहेत.
प्रोमोमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या सुद्धा आहेत. त्यांनाही महिला एक ना अनेक प्रश्न विचारत आहेत.
प्रोमोच्या शेवटी शोचा होस्ट अर्थात सुबोध भावे हाही दिसतोय. मी घेऊन येतोय स्त्रियांसाठी खास राखीव बस. जिथे येणार फक्त स्त्री सेलिब्रिटी आणि रंगणार तुफान भेटी... तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळणार... धम्माल एंटरटेनमेंट होणार, तेव्हा तिकिट काढून तयार राहा, असं तो म्हणतोय.
‘बस बाई बस’ हा शो झी मराठीवर येत्या 29 जुलैपासून दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे.