रुसलान मुमताजला अक्षय कुमारकडून मिळते प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 18:12 IST2019-02-19T18:12:09+5:302019-02-19T18:12:53+5:30
सोनी एंटरटेन्मेंटवर सुरु झालेल्या 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' ह्या रोमँटिक ड्रामाने आता चांगलीच लोकप्रियता कमावली आहे.

रुसलान मुमताजला अक्षय कुमारकडून मिळते प्रेरणा
सोनी एंटरटेन्मेंटवर सुरु झालेल्या 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' ह्या रोमँटिक ड्रामाने आता चांगलीच लोकप्रियता कमावली आहे. प्रेक्षकांना डॅशिंग एनआरआय ध्रुव रायचंदची (रुसलान मुमताज) एंट्री खूपच आवडली आहे. जो पहिल्या नजरेतच जयाच्या (सृष्टी जैन) प्रेमात पडतो.
छोट्या पडद्यावर पदार्पणाची मालिका केलेल्याच चॅनेलवर रुसलान परतला आहे. रुसलान मुमताजच्या डॅशिंग लुक्स आणि पिळदार शरीरयष्टीमुळे तो सादर करत असलेल्या भूमिकेला अनेक महिला चाहत्या लाभल्या आहेत. त्याने २००७ च्या 'मेरा पहला पहला प्यार' ह्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते आणि तो तेव्हा जसा दिसत होता तसाच अजूनही दिसतो. ह्या घटनेला बारा वर्षे झाली असली तरी त्याचे शरीर अजून तसेच आहे आणि त्यावर वयाचा अजिबात परिणाम जाणवत नाही.
त्याबद्दल बोलताना रुसलान म्हणतो, "माझ्या शरीराबद्दल मिळणाऱ्या कॉम्प्लिमेंट्स ऐकून मला खूप आनंद होतो. ह्या बाबतीत अक्षय कुमार माझा आदर्श आहे आणि मी त्याला अनुसरण्याचा प्रयत्न करतो. मी कितीही व्यस्त असलो आणि अगदी कमी वेळ असला तरी त्याच्याप्रमाणे मी व्यायामासाठी वेळ काढतोच. पण तरी मी मान्य करतो की मी त्याच्याएवढा कार्यक्षम नाही कारण मला खायला अतिशय आवडते आणि रुचकर खाणे बघून मी स्वतःवर अजिबात ताबा ठेऊ शकत नाही. मी प्रत्येक दिवशी असे फसवतो पण दुसऱ्या दिवशी जास्त व्यायाम करून सर्व कॅलरीज नष्ट करतो."
रुसलान मुमताजला बघण्यासाठी पहा मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.