रणविजय सिंग पहिल्यांदाच साकारतोय ही आव्हानात्मक भूमिका, यासाठी त्याने घेतली खूप मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 15:27 IST2021-04-02T15:24:49+5:302021-04-02T15:27:49+5:30

रणविजय सिंग आणि सनी लिओनी ही जोडी सातव्यांदा एमटीव्ही 'स्प्लिट्सविला एक्‍स ३'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

Ranvijay singh has taken on such a challenging role | रणविजय सिंग पहिल्यांदाच साकारतोय ही आव्हानात्मक भूमिका, यासाठी त्याने घेतली खूप मेहनत

रणविजय सिंग पहिल्यांदाच साकारतोय ही आव्हानात्मक भूमिका, यासाठी त्याने घेतली खूप मेहनत

रणविजय सिंग आणि सनी लिओनी ही जोडी सातव्यांदा एमटीव्ही 'स्प्लिट्सविला एक्‍स ३'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. रणविजय सिंग लवकरच सुमेर सिंग केस फाइल्स गर्लफ्रेंडमध्ये एका पोलिसाची आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसतोय. 1 एप्रिलला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

रणविजय सिंगयात एसीपी सुमेरसिंगची भूमिका साकारत आहे तसेच करिश्मा शर्मा, प्रियांका पुरोहित, अदिती आर्य आणि अलीशा मेयर यांनी त्याच्या ‘गर्लफ्रेंड्स’ची भूमिका साकारली आहे.  सुमेरसिंग केस फाईल्स: गर्लफ्रेंड्सची कथा एका प्रामाणिक आणि मेहनती पोलिस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते.  या वेब सीरिजमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार रणविजय सिंग म्हणाला, “सुमेर सिंगची व्यक्तिरेखा साकारण्यात मला खूप आनंद झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी रियालिटी शोचे बरेच चढ उतार पाहिले आहेत.  शोमध्ये मला एका पोलीस अधिकाऱ्याची वेगळी संधी मिळाली.  या भूमिकेला न्याय देण्यासाठी, मी स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिलं.  तसेच पहिल्या भागला मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप भारावून गेलो होतो आणि प्रेक्षकांनी आमचा नवीन सीझन पाहण्यास उत्सुक आहेl. मी आशा करतो की  प्रेक्षकांना नवीन सिजन पाहायला खुप आवडेल. 

Web Title: Ranvijay singh has taken on such a challenging role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.