'रंग माझा वेगळा'मधील दीपानं शेअर केला आवडत्या पार्टनरसोबतचा फोटो, फोटोची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:19 IST2022-01-03T14:19:06+5:302022-01-03T14:19:28+5:30
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपा उर्फ रेश्मा शिंदे(Reshma Shinde)च्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात.

'रंग माझा वेगळा'मधील दीपानं शेअर केला आवडत्या पार्टनरसोबतचा फोटो, फोटोची होतेय चर्चा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कथानकात येणाऱ्या ट्विस्टमुळे या मालिकेला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते आहे. या मालिकेतील कार्तिक-दीपा यांच्यासोबतच कार्तिकी आणि दीपिका या चिमुरडींनीदेखील रसिकांना आपलेसे केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ने साकारली आहे. या मालिकेनंतर तिच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाली आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. नुकताच रेश्माने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या आवडत्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने नवीन वर्षात पहिला फोटो शेअर केला आणि तोही स्पेशल व्यक्तीसोबत..तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. रेश्माने तिच्या आईसोबतचा फोटो नवीन वर्षात शेअर केला आहे आणि लिहिले की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा..! नवीन वर्षाची सुरूवात माझ्या आवडत्या पार्टनरसोबत. आई. २०२२मधील पहिला फोटो. रेश्माच्या या फोटोला चाहत्यांची खूपच पसंती मिळताना दिसते आहे.
दीपा-कार्तिकमध्ये पुन्हा निर्माण करेल का प्रेमाची ऊब...
रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत कार्तिकी-दीपिकाच्या शाळेच्या पिकनिकमुळे दीपा आणि कार्तिक एकत्र आले आहेत. पिकनिकमध्ये दीपा कार्तिक एकमेंकांशी पुन्हा मनमोकळेपणाने बोलतात. पिकनिकहून घरी परतताना कार्तिकी आणि दीपा कार्तिकसोबत निघतात. रस्त्यात गाडी बंद पडते आणि त्यांना एका ठिकाणी थांबावे लागते. तिथे दीपा खाण्यासाठी काहीतरी बनवत असताना तिचा हात भाजतो. तेव्हा कार्तिक तिच्या हातावर फुंकर घालतो. त्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येतात का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.