Rakhi Sawant : राखी सावंतची ओव्हरएक्टिंग ! कॅमेऱ्यासमोर पडली बेशुद्ध, पतीच्या अटकेनंतर राखीचा ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:52 AM2023-02-08T10:52:49+5:302023-02-08T10:57:20+5:30

आदिलचं खरं रुप लग्नाआधीच माहित असतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता असं राखीने म्हणलं आहे.

rakhi sawant faints in front of camera after husband adil got arrested | Rakhi Sawant : राखी सावंतची ओव्हरएक्टिंग ! कॅमेऱ्यासमोर पडली बेशुद्ध, पतीच्या अटकेनंतर राखीचा ड्रामा

Rakhi Sawant : राखी सावंतची ओव्हरएक्टिंग ! कॅमेऱ्यासमोर पडली बेशुद्ध, पतीच्या अटकेनंतर राखीचा ड्रामा

googlenewsNext

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यातला ड्रामा सतत सुरुच आहे. आईच्या निधनामुळे राखी सावरते तोच आता तिचा आणि पती आदिलचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे. राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. राखीने केलेल्या तक्रारीनंतर काल पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. आदिलचं खरं रुप लग्नाआधीच माहित असतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता असं राखीने म्हणलं आहे.

काल दुपारी आदिलला अटक झाल्यानंतर राखीने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. राखी म्हणाली, 'आदिलच्या आईशी बोलणं झालं. आई तर आई असते, मी त्यांना सांगितलं की मी नेहमीच तुमची सून असेल मी तुमच्यासोबत कायम उभी असेल  मात्र आदिलबाबत काही बोलू नका. त्या सुद्धा म्हणाल्या मी तुझ्या जागी असते तर मी त्याला सोडलं असतं तूही त्याला सोड.'

राखी पुढे म्हणाली,' मुंबई नगरिया आहे, स्टार बनण्याच्या नादात मुलींच्या नादात त्याने हे सगळं केलं. त्याचे अनेक क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. बंगलोर, म्हैसूरपासून काळे धंदे आहेत. लग्नाआधी याचा खरा चेहरा माहित असता तर हा दिवस बघावा लागला नसता. '

राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राखी माध्यमांसमोर बोलत असते आणि नंतर तिला अचानक चक्कर येते. आसपासचे लोक तिला सावरतात. तिला उचलून गाडीपाशी नेण्यात येते. राखीचे डोळे, चेहरा रडून रडून सुजलेला दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या राखीच्या सुरु असलेल्या या ड्रामावर नेटकरी मात्र संतापलेले आहेत. हिला काहीच कसे वाटत नाही प्रसिद्धीसाठी काहीही करणार का असा सवाल युझर्स विचारत आहेत.  

Web Title: rakhi sawant faints in front of camera after husband adil got arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.