"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:10 IST2024-06-14T13:09:43+5:302024-06-14T13:10:18+5:30

Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताने एक खास व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्टही लिहिली आहे.

raj thackeray birthday marathi actress prajakta mali shared special post | "फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट

"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर मनसे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्या अनेक पोस्टही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. राज ठाकरे आणि अनेक मराठी कलाकारांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनेकदा काही कलाकार राज ठाकरेंचं आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांना पाठिंबा देताना दिसतात. आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताने एक खास व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्टही लिहिली आहे. "आदरणीय आपणांस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा राज ठाकरेजी... जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं; ह्याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना. फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा..." असं प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसंच कमेंट करत राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ताचे राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. तिच्या अनेक इव्हेंटला राज ठाकरे पत्नीसह हजेरी लावताना दिसतात. 

Web Title: raj thackeray birthday marathi actress prajakta mali shared special post