कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 12:29 IST2023-09-19T12:24:53+5:302023-09-19T12:29:38+5:30

राहुल वैद्यने दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. दिशाची ड्यु डेट 19 ते 25 सप्टेंबर असल्याचे त्याने सांगितले. 

Rahul Vaidya says Disha Parmar is due during Ganesh Chaturthi | कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

Rahul Vaidya - Disha Parmar

वर्षभरात अनेक सेलिब्रिटी आई-बाबा झालेले पाहायला मिळाले. त्यात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री ते प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींचाही समावेश आहे. यातच दिशा परमारचेही नाव आहे. दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी त्यांच्यासाठी ही गणेश चतुर्थी खास असल्याचं म्हटलं आहे. दोघांच्याही घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. राहुलने दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. दिशाची ड्यु डेट 19 ते 25 सप्टेंबर असल्याचे त्याने सांगितले. 

दिशा आणि राहुलने आपल्या बाळाच्या आगमनाची खास तयारी केली आहे.  शिवाय, कुटुंबीय आणि चाहतेही बाळाच्या स्वागतासाठी आतूर आहेत. साहजिकच दिशाला मुलगा होतो की मुलगी हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. 

दिशा आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात सोशल मीडियावर एका कमेंटने झाली होती. राहुलचा एक म्युझिक व्हिडीओ पाहून दिशा प्रभावित झाली आणि तिने कमेंट केली. दिशा परमारची ही कमेंट पाहून राहुल खूश झाला.

पहिल्या म्युझिक अल्बमच्या शूटिंगनंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. 2020 मध्ये 'बिग बॉस 14' शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी २०२१ साली लग्न केलं.

Web Title: Rahul Vaidya says Disha Parmar is due during Ganesh Chaturthi