"मॅडम पाय घसरून पडल्या, साडीमुळे अडकल्या...", अभिनेत्रीला वाचवताना गेला राहुल बॅनर्जीचा जीव, प्रत्यक्षदर्शींनी सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:58 IST2026-04-01T12:58:05+5:302026-04-01T12:58:28+5:30

पाण्यात बुडून राहुलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. राहुल बॅनर्जीचा मृत्यू सहकलाकार असलेल्या अभिनेत्रीला वाचवताना झाल्याची माहिती समोर येत आहे. 

rahul banerjee death actor died due to saving actress shweta who fell in sea | "मॅडम पाय घसरून पडल्या, साडीमुळे अडकल्या...", अभिनेत्रीला वाचवताना गेला राहुल बॅनर्जीचा जीव, प्रत्यक्षदर्शींनी सगळं सांगितलं

"मॅडम पाय घसरून पडल्या, साडीमुळे अडकल्या...", अभिनेत्रीला वाचवताना गेला राहुल बॅनर्जीचा जीव, प्रत्यक्षदर्शींनी सगळं सांगितलं

काही दिवसांपूर्वी बंगाली सिनेइंडस्ट्रीतील ४३ वर्षीय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीचं आकस्मिक निधन झालं.  शूटिंग दरम्यान पाण्यात बुडून राहुलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. राहुल बॅनर्जीचा मृत्यू सहकलाकार असलेल्या अभिनेत्रीला वाचवताना झाल्याची माहिती समोर येत आहे. 

एका प्रत्यक्षदर्शी नावाड्याने याबाबत द टेलिग्राफला माहिती दिली आहे. राहुल बॅनर्जीच्या 'भोले बाबा पार करेगा' मालिकेचं शूटिंग समुद्रात सुरू होतं. मालिकेतील हनिमून सीन शूट करण्यासाठी कलाकारांना गुडघाभर पाण्यात उभं राहायचं होतं. राहुलसोबत अभिनेत्री श्वेता मिश्रादेखील होती. शूटिंग सुरू असतानाच श्वेताचा तोल गेला आणि ती समुद्राच्या तळाशी असलेल्या खोलगट भागात पडली. "मॅडम पाय घसरून पडल्या तेव्हा राहुलजी तिथेच उभे होते. साडी नेसल्यामुळे मॅडम पाण्यात अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी राहुलजींनी तात्काळ पाण्यात उडी घेतली. त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ते जिवंत होते. खोकत होते, तोंडातून पाणी बाहेर काढत होते, श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत होता. मात्र त्यानंतर शूटिंग क्रूने ताबा हाती घेतला", अस प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याची टीम दीघा येथील तालसरी समुद्रात शूटिंग करत होते. राहुल बुडाल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी १ तास लागला. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. चित्रिकरणाची कोणतीही परवानगी टीमकडून घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती ओडिसा पोलिसांनी दिली. 

Web Title: rahul banerjee death actor died due to saving actress shweta who fell in sea