लग्नाच्या 9 वर्षांनंतर 'राधाकृष्ण' फेम अभिनेत्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर, पत्नीही आहे प्रसिद्ध गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:03 IST2023-08-28T14:36:59+5:302023-08-28T16:03:39+5:30

दोघांमध्ये अनेक मतभेद झाले असून आता हे जोडपे वेगळ होणार असल्याची बातमी समोर आली आहे..मात्र त्याच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला आहे.

Radhakrishna fame malhar pandya priya patidar divorce after 9 years of marriage living separate from years | लग्नाच्या 9 वर्षांनंतर 'राधाकृष्ण' फेम अभिनेत्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर, पत्नीही आहे प्रसिद्ध गायिका

लग्नाच्या 9 वर्षांनंतर 'राधाकृष्ण' फेम अभिनेत्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर, पत्नीही आहे प्रसिद्ध गायिका

'राधाकृष्ण', 'इश्कबाज','सूर्यपुत्र कर्ण', आणि 'नजर' अशा लोकप्रिय मालिकांमधून  मल्हार पांड्या हा चेहरा घराघरात पोहोचला. मल्हार सध्या त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे.  लग्नाच्या 9 वर्षांनंतर पत्नी प्रिया पाटीदारपासून घटस्फोट घेत वेगळा होणार अशी माहिती समोर येतेय. हे कपल गेल्या एक वर्षांपासून वेगळे राहत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2014 मध्ये लग्नबंधनात अडकलेला अभिनेता मल्हार पंड्या आणि गायिका प्रिया पाटीदार बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत आहेत.  मात्र आता दोघांमध्येही काही ठिक नसल्याचं कळतयं. त्याच्यात अनेक मतभेद झाले असून आता हे जोडपे वेगळ होणार असल्याची बातमी समोर आली आहे..मात्र त्याच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला आहे.

मीडियारिपोर्टनुसार, अभिनेता मल्हार पंड्या आणि गायिका प्रिया पाटीदार गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत.  मल्हार आणि प्रिया यांच्यात दुरावा लॉकडाऊन दरम्यानच सुरू झाला होता. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ते वेगळे राहत आहेत.

मल्हार शेवटचा टीव्हीवर २०२० मध्ये राधाकृष्णमध्ये दिसला होता. अभिनेता आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. रिपोर्टनुसार, वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनातून थोडा ब्रेक घेण्यासाठी तो तिथे गेला असल्याचं बोललं जात आहे.
 

Web Title: Radhakrishna fame malhar pandya priya patidar divorce after 9 years of marriage living separate from years