"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:25 IST2025-11-06T11:25:03+5:302025-11-06T11:25:59+5:30
प्रियाने केलेलं अ परफेक्ट मर्डर' नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे.

"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं. आजही प्रियाची चाहत्यांना आणि तिच्या सहकलाकारांना तेवढीच आठवण येते. प्रियाने अशी अकाली एक्झिट घेतल्याने सर्वांना धक्का बसला. प्रिया 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत शेवटची दिसली. तसंच ती 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचेही प्रयोग करत होती. आता हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे आणि प्रियाच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
'अ परफेक्ट मर्डर' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. याआधीही नाटकात प्रिया मराठे, पुष्कर श्रोत्री, सतीश राजवाडे, होते. तर आता प्रियाच्या जागी दीप्ती भागवतला घेण्यात आले आहे. अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, दीप्ती भागवत, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री यांची नाटकात मुख्य भूमिका आहे. नाटकाच्या प्रयोगाआधी पुष्कर श्रोत्रीने प्रियाचा फोटो शेअर करत लिहिले, ""ए हा s s य..." तुझ्याच सारखी हाक मारतोय तुला, प्रिया...ह्या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू... तुझ्या आठवणीत पुन्हा ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करतोय आम्ही... आमच्यावर असंच प्रेम असू दे तुझं!"
'अ परफेक्ट मर्डर' नाटक रंगभूमीवर पुन्हा येतंय, प्रिया मराठेच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री
प्रियाने या नाटकातून रंगभूमी गाजवली होती. तिला पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जुन यायचे. पुष्करच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रिया होती तेव्हाच नाटक पाहिलं होतं अशी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रियाने अप्रतिम काम केलं होतं. कधीच विसरु शकत नाही. तिने अगदी सहज मीराची व्यक्तिरेखा साकारली होती', 'मी पाहिला होता प्रिया ताईने सादर केलेला प्रयोग. अजून आठवणीत आहे.'