'आर्या चुकीची मान्य पण...'; पुष्कर जोगने खास पोस्ट करत दाखवली निक्की तांबोळीची चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 11:34 IST2024-09-15T11:33:07+5:302024-09-15T11:34:13+5:30
आर्या जाधवला काल बिग बॉसने घराबाहेर काढल्याने पुष्कर जोगने तिला सपोर्ट करताना खास पोस्ट केलीय (aarya jadhav, pushkar jog, bigg boss marathi 5)

'आर्या चुकीची मान्य पण...'; पुष्कर जोगने खास पोस्ट करत दाखवली निक्की तांबोळीची चूक
आर्या जाधवला काल बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून बाहेर काढण्यात आलं. आर्या जाधवचा प्रवास अर्ध्यावरच संपला. निक्की तांबोळीवर टास्कदरम्यान हात उगारल्याने आर्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना बिग बॉसने दिलेला निर्णय पटला नाहीय. अशातच बिग बॉस मराठी सीझन १ चा स्पर्धक आणि मराठी अभिनेता पुष्कर जोगने त्याची खास प्रतिक्रिया दिली आहे.
पुष्करने आर्याला केला सपोर्ट
पुष्कर जोगने सोशल मीडियावर आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर खास पोस्ट लिहिलीय. पुष्कर लिहितो, "मी आर्याच्या बाजूने उभा आहे. माझा आर्याला मनापासून पाठिंबा आहे. मला मान्य आहे आर्या चुकली आहे. पण सहाव्या आठवड्यात निक्कीचं माणुसकी सोडून सर्वांसोबतचं आक्रमक वागणं सुद्धा विसरता कामा नये. निक्कीची भाषा आणि कोणालाच आदर न करण्याचा स्वभाव यामुळे तिलाही शिक्षा झाली पाहिजे."
बिग बॉसने आर्याला बाहेर काढलं
'बिग बॉस मराठी'च्या घरात गुरुवारी कॅप्टन्ससीचा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोणावर हात उगारायला बंदी आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले. अखेर अंतिमतः आज आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं. त्यामुळे आर्याचा प्रवास संपला आहे.