धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:17 IST2025-07-05T10:15:58+5:302025-07-05T10:17:56+5:30
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाला गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तानियाच्या वडिलांवर शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. हे प्रकरण मोगा जिल्ह्यातील कोट इसे खान परिसरात घडले. तानियाचे वडील डॉ. अनिल जीत सिंग कंबोज हे आपल्या क्लिनिकमध्ये काम करत असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या
अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबाराची धक्कादायक घटना
तानियाच्या वडील डॉ. कंबोज हे डॉक्टर आहेत. गोळीबारात डॉ. कंबोज यांना दोन गोळ्या लागल्या असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोर रुग्ण असल्याचे भासवून त्यांच्या हरबंस नर्सिंग होम क्लिनिकमध्ये आले आणि अचानक त्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. या प्रकरणी पोलीस तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
तानियाने या घटनेनंतर तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. तिने लिहिलं की, “माझे वडील सध्या गंभीर अवस्थेत आहेत. आम्ही भावनिकदृष्ट्या फार कठीण काळातून जात आहोत. कृपया कुठल्याही अफवा पसरवू नका आणि आम्हाला थोडा वेळ व शांतता द्या.” तानिया ही पंजाबमधील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘किस्मत’, ‘सुफना’, ‘गुड्डीयाँ पटोले’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने नाव कमावलं आहे. वडिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा गंभीरतेने तपास करत आहेत.