"पोट, मांड्यांवर इंजेक्शन घेतले, अन्...", आई होण्यासाठी संकटांशी झुंजली अभिनेत्री, म्हणाली-"खूप त्रास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:06 IST2025-11-01T14:00:25+5:302025-11-01T14:06:24+5:30
आईपण सोपं नाही! अभिनेत्री सांगितला गरोदरपणातला अनुभव, म्हणाली-"मला बेशुद्ध..."

"पोट, मांड्यांवर इंजेक्शन घेतले, अन्...", आई होण्यासाठी संकटांशी झुंजली अभिनेत्री, म्हणाली-"खूप त्रास..."
Yuvika Chaudhary: 'बिग बॉस ९' फेम युविका चौधरी हे सतत चर्चेत राहणारं नाव आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर 'ओम शांती ओम' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, सौंदर्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही. 'नच बलिए-9' च्या पर्वात ती प्रिन्स नरुलासोबत तिची जोडी जमली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.२०१८ साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षानंतर हे दोघं आईबाबा झाले. मात्र, तिचा हा प्रवास फार सोपा नव्हता.
युविका नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली नव्हती. त्यामुळे तिने आयव्हीएफचा पर्याय निवडला. यादरम्यान, आलेल्या अनुभवांबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.'हॉटरफ्लाय'शी बोलताना युविका चौधरी म्हणाली,"मला बाळ हवं होतं.यामुळे मला खूप दबाव जाणवत होता तर प्रिन्स एकदम निवांत होता. त्यानंतर अभिनेत्रीने असंही सांगितलं की तिने, पूर्वी ज्या डॉक्टरचा सल्ला घेतला होता तो योग्य नव्हता. त्यांच्या सल्ल्याने तिला केवळ नुकसान सहन करावं लागलं.
डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून घाबरलेली...
पुढे युविका म्हणाली," एका डॉक्टरने मला म्हटलं की माझे एग्ज खराब झाले आहेत. ते सगळं ऐकून मी प्रचंड टेंन्शमध्ये आले होते. मला स्वत वरच शंका येऊ लागली.त्यावेळी मी फक्त ३८ वर्षांची होते. जेव्हा डॉक्टरांनी मला असं सांगितलं ते ऐकून माझा आत्मविश्वास शुन्यावर पोहोचला. या काळात आम्ही जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले होते. रोज मांड्या आणि पोटावर इंजेक्शन घ्यावे लागायचे. या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं.मला खूप त्रास व्हायचा. एकदा मल बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं जाणार होतं. त्यावेळी हे इंजेक्शन घेतल्यानंतर शुद्ध आली नाही तर ही आमची जबाबदारी नसेल असं म्हणत त्या क्लिनिकमधील डॉक्टरांनी हात वर केले. त्यानंतर मी आणि प्रिन्सने ते क्लिनिक सोडण्याचा निर्णय घेतला मला वाटलं आमचे पैसे वाया गेले. यानंतर मी दुसऱ्या एका डॉक्टरला भेटल्यानंतर आत्मविश्वास वाढला. आणि पहिल्याच प्रयत्नात गरोदर राहिले. " असा खुलासाही अभिनेत्रीने केला.
वर्कफ्रंट
'ओम शांती ओम' च्या यशानंतर युविकाने समर २००७, तो बात पक्की आणि नॉटी, द शॉकीन्स चित्रपटांमध्ये झळकली. परंतु, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज', 'बिग बॉस-9',एमटीवी स्पिट्सविला 10', 'नच बलिए-9' च्या पर्वातही ती पाहायला मिळाली.