प्रिन्स नरुलानं पुन्हा केलं लग्न, पण कुणासोबत? कारण वाचाल तर थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:18 IST2025-05-27T11:14:11+5:302025-05-27T12:18:17+5:30
प्रिन्स नरुला पुन्हा लग्न चर्चेत आला आहे.

प्रिन्स नरुलानं पुन्हा केलं लग्न, पण कुणासोबत? कारण वाचाल तर थक्क व्हाल!
छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय अशी ओळख मिळवलेला प्रिन्स नरुला कायमच चर्चेत असतो. अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेऊन प्रिन्सने प्रसिद्धी मिळवली. रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास त्याने केला आहे. आता प्रिन्स नरुला चर्चेत आला आहे. तो पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. प्रिन्स नरुलानं पत्नी युविका चौधरी हिच्याशीच पुन्हा लग्न केलंय. विशेष म्हणजे या दोघांनी सात वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगीदेखील आहे. या लग्नाबद्दल युविकाने यूट्यूबवर एक व्लॉग व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
व्लॉगमध्ये युविका सुंदर लाल अनारकली सूटमध्ये दिसली. तर प्रिन्स हा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये होता. या खास विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते. युविकाचा भाऊ आणि वहिनी, तसेच प्रिन्सचे मित्र साक्षीदार म्हणून उपस्थित होते. चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्यांच्या केमिस्ट्रीचं भरभरून कौतुक केलं. लेकीच्या जन्मानंतर प्रिन्स आणि युविका यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही वेगळे होणार असल्याचं बोललं जात होतं. पण, आता सर्व चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
खरं तर प्रिन्स आणि युविका यांनी त्यांचं लग्न रजिस्टर केलं आहे. सात वर्षांनंतर अखेर त्यांचे लग्न नोंदणीकृत झाल्याबद्दल दोघांनीही आनंद व्यक्त केला. प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची ओळख 'बिग बॉस सीझन ९' मध्ये झाली होती. या शोमध्येच दोघांमध्ये जवळीक वाढली. युविका लवकरच शोमधून बाहेर पडली, पण प्रिन्सने सीझन जिंकला. यानंतर दोघांनी २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका व प्रिन्स यांच्या लेकीचं नाव 'एक्लीन' असं आहे. युविका व प्रिन्स दोघेही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.