एक नंबर, तुझी कंबर...! 'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:23 IST2025-06-06T14:17:43+5:302025-06-06T14:23:38+5:30

'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक

premachi goshta serial mukta and sagar onscreen daughter sai dance on trending song netizens praise | एक नंबर, तुझी कंबर...! 'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक

एक नंबर, तुझी कंबर...! 'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक

Ira Parwade Video: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा कमालीचा वाढत चालला आहे. या मालिकांबरोबर त्यामध्ये झळकणाऱ्या प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अशीच एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट'. या मालिकेत स्वरदा ठिगळे,राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर आणि बालकलाकार इरा परवडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये ही मालिका प्रचंड चर्चेत आली होती. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं आहे. दरम्यान, या मालिकेतील बालकलाकार इरा परवडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूप चर्चेत आहे. 


सध्या सोशल मीडियावर दिवसेंदिवस नवीन ट्रेंडिंग गाण्यांचे आणि डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकप्रिय गाण्यावर नेटकऱ्यांसह अनेक कलाकारमंडळी देखील  रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर 'एक नंबर, तुझी कंबर' हे गाणं चांगलचं चर्चेत आहे. या गाण्यावर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील चिमुकल्या सईने जबरदस्त असा डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी इरा परवडेचं कौतुक करताना दिसत आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावर सईचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सई म्हणजेच तिच्या बहिणीसोबत डान्स करताना दिसते आहे. 
यावेळी नेटकरी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "Nice Dance Sai...", अशा कमेंट्स सईच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी केल्याच्या पाहायला मिळत आहेत. 

Web Title: premachi goshta serial mukta and sagar onscreen daughter sai dance on trending song netizens praise