"तू यासाठी पात्र नाहीस", सर्वोत्कृष्ट पत्नी म्हणून नव्या मुक्ताला मिळाला अवॉर्ड, चाहत्यांची नाराजी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:55 IST2025-03-17T13:54:45+5:302025-03-17T13:55:10+5:30

यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

premachi goshta fame mukta aka swarda thigale gets trolled for receiving award netizens said tejashree pradhan deserved this | "तू यासाठी पात्र नाहीस", सर्वोत्कृष्ट पत्नी म्हणून नव्या मुक्ताला मिळाला अवॉर्ड, चाहत्यांची नाराजी, म्हणाले...

"तू यासाठी पात्र नाहीस", सर्वोत्कृष्ट पत्नी म्हणून नव्या मुक्ताला मिळाला अवॉर्ड, चाहत्यांची नाराजी, म्हणाले...

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहच्या मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 

स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरुन स्वरदा ठिगळेचा अवॉर्ड स्वीकारतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर कमेंट चाहत्यांनी नाराजी दर्शविली आहे. "कष्ट एकीचे अवॉर्ड एकीला", "खरं तर हा अवॉर्ड तेजश्रीला दिला पाहिजे होता", "एक पुरस्कार वाया गेला", "हा अवॉर्ड तेजश्रीचा आहे", "जुन्या मुक्ताचा अवॉर्ड आहे हा', "हा मान तेजश्रीचा आहे. तिच्यामुळेच मालिका चालत होती", "तू यासाठी पात्र नाहीस" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताची भूमिका साकारून अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. इतर भूमिकांप्रमाणेच तेजश्रीच्या या भूमिकेलाही चाहत्यांचं प्रेम मिळालं. मात्र काही दिवसांपूर्वीच अचानक तेजश्रीने या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळेती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एन्ट्री झाली होती. सध्या स्वरदा मालिकेत मुक्ताची भूमिका साकारत आहे. 

Web Title: premachi goshta fame mukta aka swarda thigale gets trolled for receiving award netizens said tejashree pradhan deserved this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.