"ते दृश्य खूप भयानक…", 'बालिका वधू' फेम प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल एक्स बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा, उघड केलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:24 IST2025-11-28T16:10:16+5:302025-11-28T16:24:16+5:30
अवघ्या २४ व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं! प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल एक्स बॉयफ्रेंड म्हणाला...

"ते दृश्य खूप भयानक…", 'बालिका वधू' फेम प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल एक्स बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा, उघड केलं सत्य
Pratyusha Banerjee: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हे टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव. बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी या जगात नाही.परंतु,तिच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. २०१६ मध्ये अभिनेत्रीने आत्महत्या करीत स्वत चं जीवन संपवलं. तिच्या मृत्यूनंतर कलाविश्व हादरलं होतं. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकर आणि लिव्ह इन पार्टनर राहुलवर गंभीर आरोप करण्यात आले होते. जवळपास ९ राहुल राज सिंहने या आरोपांना प्रत्युतर दिलं आहे. शिवाय आयु्ष्यातील काही कटू अनुभवांविषयी देखील भाष्य केलं आहे.
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.तिच्या मृत्यूनंतर बॉयफ्रेंड राहुलवर अनेक आरोप लावण्यात आले होते.मात्र, पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार तिच्या मृत्यूचे कारण गुदमरल्याने असल्याचे म्हटले होते, परंतु अभिनेत्रीच्या कुटुंबाने प्रत्युषाच्या मृत्यूसाठी तिचा प्रियकर राहुलला जबाबदार धरलं.
अलिकडेच फ्री प्रेस जर्नला दिलेल्या मुलाखतीत राहुल राज सिंहने अनेक खुलासे केले. प्रत्युषाच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यामध्ये फोनवर बोलणं झाल्याचंही त्याने या मुलाखतीत म्हटलं आहे. या प्रकरणी बोलताना राहुल सिंह म्हणाला,"मी सगळ्यात आधी तिथे पोहोचलो आणि चावी बनवणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तिथे आमच्या फ्लॅटला जोडलेली बाल्कनी होती. बेल वाजवूनही ती दार उघडत नसल्याने बाल्कनीतून गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो. मी कुलूपही तोडण्याचा प्रयत्न केला."
मग तो म्हणाला,"त्यावेळी मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला वाटलं की कदाचित ती दारु प्यायली असेल. तेव्हा चावी बनवणारा माणूस माझ्या मागून आला.तो खूप घाबरला होता. त्याचे हात थरथर कापत होते. आतून दरवाजाचं कुलूप उघडत नव्हतं कारण तो तिला लटकलेलं पाहून प्रचंड घाबरला होता. जेव्हा त्याने दार उघडलं आणि मी वर पाहिले तेव्हा ती काळ्या सॅटिनच्या कापडात लटकलेली होती. ते दृश्य खूप भयानक होतं. मात्र, हे सगळं घडल्यानंतर दोष मला देण्यात आला. त्यांनी मला स्मशानातही जाऊ दिले नाही., 'तो खुनी आहे, त्याने तिला मारले, त्याने तिला फाशी दिली. असे ते माझ्याविषयी बोलत राहिले."असा खुलासा त्याने केला.