अखेर स्वप्न पूर्ण झालं! मुग्धा-प्रथमेशच्या घरी आली नवी पाहुणी; कलाविश्वातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:01 IST2026-01-12T08:57:57+5:302026-01-12T09:01:33+5:30
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन अन् प्रथमेश लघाटेनं दिली गुडन्यूज! खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ केला शेअर

अखेर स्वप्न पूर्ण झालं! मुग्धा-प्रथमेशच्या घरी आली नवी पाहुणी; कलाविश्वातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan : मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी म्हणून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांना ओळखलं जातं. सारेगमप लिटिल चॅम्प्स ' या लोकप्रिय कार्यक्रमातून हे दोघंही नावारुपाला आले.त्यांच्या गायनाटं नेहमीच भरभरुन कौतुक होत असतं. साधं राहणीमान, त्यांचे संस्कार यामुळे या जोडप्यावर नेटकरी कायम कौतुकाचा वर्षाव करत असतात.प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. सध्या हे कपल एका खास कारणामुळे चर्चेत आलं आहे. नुकताच प्रथमेश-मु्ग्धाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रथमेश आणि मुग्धाने मोठी भरारी घेत आता स्वत:ची गाडी घेतली आहे. या लोकप्रिय जोडप्याने 'innova crysta' ही नवीन गाडी खरेदी केली आहे. प्रथमेश आणि मुग्धा आपल्या कुटुंबीयांच्या साथीने या नव्या गाडीची पूजा देखील केली. प्रथमेशने या पोस्टमध्ये म्हटलंय, "मी सुरुवातीपासून टोयोटाचा सर्वात मोठा फॅन आहे. आता आम्ही आणखी एक इनोव्हा क्रिस्टाचे स्वागत करत आहोत...".
मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा-प्रथमेशने खरेदी केलेल्या कारची किंमत सध्या २५ लाखांच्या घरात आहे. तसेच, या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत १८.८५ लाख रुपये आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.