म्हणून प्रसिद्धी किशोर झाली IN अाणि शिवानी रांगोळे झाली OUT

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 17:50 IST2018-10-05T17:49:42+5:302018-10-05T17:50:52+5:30

'आम्ही दोघी' मालिकेत शिवानी रांगोळेच्या जागी प्रसिद्धी किशोरने घेतली आहे. 

Prasiddhi Kishor replaced Shivani Rangole in Aamhi Doghi Serial | म्हणून प्रसिद्धी किशोर झाली IN अाणि शिवानी रांगोळे झाली OUT

म्हणून प्रसिद्धी किशोर झाली IN अाणि शिवानी रांगोळे झाली OUT

ठळक मुद्दे'आम्ही दोघी' मालिकेत प्रसिद्धी किशोर मधुराच्या भूमिकेत


लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून शनायाच्या भूमिकेत अभिनेत्री रसिका सुनीलची जागा ईशा केसकरने घेतल्यानंतर आता 'आम्ही दोघी' मालिकेत शिवानी रांगोळेच्या जागी प्रसिद्धी किशोरने घेतली आहे. 
भिन्न स्वभावाच्या बहिणींवर आधारीत असलेली झी युवा वाहिनीवरील आम्ही दोघी मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील मीरा व मधुरा रसिकांना खूप भावल्या. या मालिकेत मधुराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळेने ही मालिका सोडली असून तिच्या जागी प्रसिद्धी किशोर ही नवीन अभिनेत्री पाहायला मिळते आहे. शिवानीने ही मालिका का सोडली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. शिवानी युएसला फिरण्यासाठी गेल्यामुळे तिला ही मालिका सोडावी लागली. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून शिवानीची जागा प्रसिद्धी किशोरने घेतली आहे. प्रसिद्धी किशोरने नकुशी मालिकेत काम केले आहे. आता नवीन मधुरा रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
'आम्ही दोघी' या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत. 
 

Web Title: Prasiddhi Kishor replaced Shivani Rangole in Aamhi Doghi Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.