प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट
By कोमल खांबे | Updated: March 10, 2025 12:38 IST2025-03-10T12:37:37+5:302025-03-10T12:38:43+5:30
मंजिरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं कौतुक केलं आहे. आमच्याप्रमाणेच मयंकलाही याच क्षेत्रात काम करायचं असल्याचं तिने म्हटलं आहे.

प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट
प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने अभिनय, टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात नाव कमवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता प्रसादच्या पावलावरच त्याचा लेकही पाऊल टाकत आहे. प्रसादचा लेक मयंकलाही अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे. गेली ३-४ वर्ष तो एकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहे. नुकतंच त्याने एका एकांकिकेचं दिग्दर्शनही केलं. त्याच्या एकांकिकेला पारिषोतिक मिळालं आहे. याबाबत मंजिरी ओकने पोस्ट शेअर केली आहे.
मंजिरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं कौतुक केलं आहे. आमच्याप्रमाणेच मयंकलाही याच क्षेत्रात काम करायचं असल्याचं तिने म्हटलं आहे.
मंजिरी ओकची पोस्ट
जिथून माझा आणि प्रसादचा प्रवास एकत्र सुरू झाला ती गोष्ट म्हणजे “एकांकिका”. क्षेत्र कोणतंही असो…पाया पक्का असायलाच हवा. आणि आमच्या क्षेत्रातला पाया म्हणजे “एकांकिका”.
आज आमच्या मयंकची सुद्धा याच क्षेत्रात येण्याची इच्छा आहे. आणि त्याचा पायासुद्धा त्यांनीच भक्कम केला आहे याचा आनंद आहे. रुईया महाविद्यालयाकडून गेली ३/४ वर्ष मयंक वेगवेगळ्या एकांकिकांमधे सहभागी होत होताच. पण आता कॉलेज संपत आलं असताना… लेखक शंकर पाटील यांच्या कथेवर प्रेरणा घेऊन मयंकच्या मित्रांनी एक एकांकिका लिहिली आणि मयंकनी स्वतः ती एकांकिका दिग्दर्शित केली. त्याची प्रकाशयोजना पण केली. बाकी मित्रांनी इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या.
काल कॉलेजमधेच झालेल्या स्पर्धेत मयंकच्या ह्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक, दिग्दर्शक म्हणून मयंकला आणि एकांकिकेला इतरही बरीच पारितोषिके मिळाली. नटराजाच्या आशिर्वादाने सुरुवात तर उत्तम झालीये. आता पुढचा पूर्ण प्रवाससुद्धा असाच यशस्वी होवो… याच आम्हा दोघांकडून मयंक ला शुभेच्छा आणि प्रचंड प्रेम…!!!
मंजिरी ओकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक कलाकारांनीही मंजिरीच्या या पोस्टवर कमेंट करत मयंकला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे.