"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 18:40 IST2023-12-11T18:39:59+5:302023-12-11T18:40:20+5:30

'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत 'बिग बॉस'च्या घरातच अमृताला प्रपोज करणार होतो, असा खुलासा प्रसादने केला आहे. 

prasad jawade revealed he wanted to proposed amruta deshmukh in bigg boss marathi house | "बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा

"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच मराठी कलाविश्वातील अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही लोकप्रिय जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमृता-प्रसादने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद-अमृताने त्यांची लव्हस्टोरी, रिलेशनशिप यावर भाष्य केलं. याबरोबरच अनेक गोष्टींचा खुलासाही या मुलाखतीत त्यांनी केला. 

अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला अमृता-प्रसादची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्यातील प्रेम फुलू लागलं होतं. प्रेक्षकांनाही 'बिग बॉस'च्या घरातील प्रसाद-अमृताची जोडी आवडली होती. परंतु, 'बिग बॉस'च्या घरात नंतर त्यांच्यात बिनसलं होतं. आता 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत 'बिग बॉस'च्या घरातच अमृताला प्रपोज करणार होतो, असा खुलासा प्रसादने केला आहे. 

प्रसाद म्हणाला, "मी बिग बॉसच्या घरात अमृताला प्रपोज केलेलं तेव्हाच मी तिला I Love You बोलणार होतो. पण, ती काय उत्तर देईल? तिला काही कळणार नाही, तिला विचित्र वाटेल...असा विचार करून मी तिथल्या तिथे ते फिरवलं होतं. मला तुझी फ्रेंडशिप देते का? असं मी म्हणालो होतो. पण, तेही माझ्यावर उलटलंच...प्रपोज करण्याची चांगली संधी घालवली, असं सगळे मला म्हणायला लागले. पण, मला वाटलेलं की तिला ते कदाचित awkword होऊ शकतं...आणि नाही म्हणाली तर काय? जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा काय होईल आणि काय नाही असा विचार करत नाहीत. तेव्हा तुम्ही खरंच मोकळेपणाने बोललं पाहिजे. पण, मला तेव्हा तिच्या बाजूने मनात विचार येत होते. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच प्रसाद आणि अमृताने प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर २० नोव्हेंबरला सप्तपदी घेत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. 
 

Web Title: prasad jawade revealed he wanted to proposed amruta deshmukh in bigg boss marathi house