Prarthana Behere : १५ वर्षांनंतर... प्रार्थना बेहरेची 'ती' इच्छा पूर्ण, व्हिडिओ शेअर करत दिले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:46 IST2023-02-27T15:44:28+5:302023-02-27T15:46:00+5:30
प्रार्थनाने पोस्ट केलेला व्हिडिओ खूपच खास आहे.

Prarthana Behere : १५ वर्षांनंतर... प्रार्थना बेहरेची 'ती' इच्छा पूर्ण, व्हिडिओ शेअर करत दिले सरप्राईज
Prarthana Behere : मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतीच तिची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका चांगलीच गाजली. दरम्यान प्रार्थनाची एक इच्छा १५ वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. इच्छा नाही तर ते तिचं स्वप्नच पूर्ण झाल्यासारखं आहे. प्रार्थनाने नृत्याचे धडे घेतले आहेत. तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती भरतनाट्यम करताना दिसत आहे.
प्रार्थनाने पोस्ट केलेला व्हिडिओ तिच्यासाठी खूपच खास आहे. भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणापूर्वी तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. गुलाबी आणि हिरव्या काठाची साडी, गजरा, साजेसे दागिने असा तिचा लुक आहे. पायात घुंगरु बांधून नृत्य करताना व्हिडिओत शेवटी दिसते. खूपच सुंदर असा हा व्हिडिओ आहे. १५ वर्षांनंतर...तुमच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी खूप खूप आभार.'
प्रार्थनाला हा पारंपारिक लुक खूपच छान दिसतोय. त्यात तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. 'टॅलेंटेड प्रार्थना' अशा शब्दात चाहतेही तिचे कौतुक करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.