कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:14 IST2025-11-03T12:14:03+5:302025-11-03T12:14:49+5:30
Pranit More Health Update: प्रणित मोरेच्या सोशल मीडियावर त्याच्या टीमने काही तासांपूर्वी स्टोरी पोस्ट केली आहे.

कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
'बिग बॉस १९' मध्ये मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची खूप चर्चा होती. पण अचानक प्रणित घराबाहेर आला आहे. तब्येतीच्या कारणामुळे त्याला शो सोडावा लागला आहे. आधी प्रणित सीक्रेट रुममध्ये जाणार असंही बोललं जात होतं. मात्र आता तो शोच्या बाहेरच आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कालच्या वीकेंड का वारमध्ये सलमानने सर्व सदस्यांना प्रणितबद्दल सांगितले तेव्हा सर्वांनाच वाईट वाटले. दरम्यान शोबाहेर आल्यानंतर प्रणितची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
प्रणित मोरेच्या सोशल मीडियावर त्याच्या टीमने काही तासांपूर्वी स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिले आहे की ,"हॅलो मित्रांनो, सगळ्यांना कळवण्यात येत आहे की, प्रणितची तब्येत आता बरी आहे. आम्ही बिग बॉस टीमच्या संपर्कात आहोत आणि त्याच्या प्रकृतीबद्दल ते आम्हाला प्रत्येक अपडेट देत आहेत. तुम्हा सगळ्यांच्या दाखवलेल्या पाठिंब्यासाठी, प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खूप खूप आभार. तो लवकर बरा होऊ दे यासाठी प्रार्थना करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र."

प्रणित मोरेच्या टीमने शोमधील काही एपिसोडच्या क्लिप्स शेअर करत पोस्टही केली आहे. प्रणितसोबत नेहमी उभे राहणाऱ्या सदस्यांचा व्हिडिओ यामध्ये आहे. 'पॉझिटिव्ह ग्रुप, पॉझिटिव्ह आठवणी' असं त्यांनी लिहिलं आहे.
प्रणितने एक्झिट घेतल्याने या आठवड्यात कोणतंही एलिमिनेशन झालेलं नाही. आता चाहत्यांना प्रणितला परत बिग बॉसच्या घरात पाहायचं आहे. मात्र ते शक्य होईल की नाही, हे येणाऱ्या काहीच दिवसांत कळेल. या आठवड्यातच प्रणित घराचा कॅप्टन झाला होता. आणि त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत.