'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:46 IST2025-10-24T12:46:32+5:302025-10-24T12:46:57+5:30
प्रणितच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
'बिग बॉस १९'मध्ये मराठी कॉमेडियन प्रणित मोरे लक्ष वेधून घेतो. कोणी कितीही बोललं किंवा त्याची खिल्ली उडवली तरी तो सगळ्यांना तितकंत हसवतो. प्रणितला मराठी प्रेक्षक, इन्फ्लुएन्सर भरपूर पाठिंबा देत आहेत. यापुढेही तो असाच शोमध्ये टिकून राहावा अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये प्रणितचा पुन्हा एकदा कॉमेडी शो पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये प्रणित मोरेचा कॉमेडी शो पाहायला मिळत आहे. प्रणित सर्वांवर काही ना काही जोक करत आहे. तो म्हणतो, 'फरहाना अपमानातही आदर दाखवते. आप घटिया औरत हो कुनिका जी'. 'कुनिका जी कोण बोलतं?' यानंतर त्याने अशनूर, शहबादचीही खिल्ली उडवली. प्रणितच्या या कॉमेडीमुळे घरातलं वातावरण हलकं फुलकं झालं.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'अमालच्या वाईट रेडिओ शोपेक्षा प्रणितचा कॉमेडी शो १० पट चांगला आहे','बजाज आणि प्रणितला टॉप २ मध्ये बघायचं आहे','प्रणितला बाहेर काढू नका, तो खूप मस्त खेळतोय..टॉप ५ पर्यंत जाण्यासाठी तो पात्र आहे','प्रणितला वोट करा' अशा कमेंट्स आल्या आहेत.
तसंच या आठवड्यात घराचा कॅप्टनही निवडला जाणार आहे. काही जणांनी प्रणित मोरे आणि मृदुलचं नाव घेतलं. दोघांमध्ये मृदुलला सदस्यांची जास्त मतं मिळाल्याची चर्चा आहे. घराचा कॅप्टन प्रणित की मृदुल नक्की कोण आहे हे लवकरच समजणार आहे.