भांडण मिटलं, दुरावा संपला; प्रणित मोरे- मालती चहर अखेर एकत्र आले, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:04 IST2026-01-06T15:02:44+5:302026-01-06T15:04:52+5:30
'बिग बॉस १९'मध्ये शेवटच्या दिवसांत मालती आणि प्रणितमध्ये मतभेद झाले. मालती घरातून निघतानाही प्रणितला भेटली नाही. अखेर प्रणित आणि मालती अनेक महिन्यांनी एकमेकांशी बोलताना दिसले.

भांडण मिटलं, दुरावा संपला; प्रणित मोरे- मालती चहर अखेर एकत्र आले, व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस १९'चा सीझन संपून आता काही आठवडे उलटले आहेत, मात्र या शोमधील स्पर्धकांची मैत्री आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. या सीझनचा विजेता गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणित मोरे आणि आवेज दरबार या 'पॉझिटिव्ह गँग'ने नुकतीच दुबईत एकत्र येऊन मोठी मज्जा केली. यात सर्वाचं लक्ष वेधलं ते गौरव मोरे आणि मालती चहर यांच्यावर.
'बिग बॉस १९'मध्ये शेवटच्या दिवसांत मालती आणि प्रणितमध्ये मतभेद झाले. मालती घरातून निघतानाही प्रणितला भेटली नाही. याशिवाय 'बिग बॉस १९' संपल्यावर प्रणित सर्वांना भेटला पण मालतीला भेटला नव्हता. अखेर या गेट-टूगेदर निमित्ताने प्रणित आणि मालती अनेक महिन्यांनी एकमेकांशी बोलताना दिसले.
दुबईत रंगली सक्सेस पार्टी
एका व्हायरल व्हिडीओत आवेज दरबारचा आवाज ऐकायला मिळतो. तो प्रणित मोरेला पुढे बोलावतो. सोफ्यावर मालती बसलेली असतो. तो प्रणितला मालतीशी बोलायला सांगतो. प्रणित सुरुवातीला आढेवेढे घेतो. पण पुढे तो मालतीच्या बाजूला बसतो. मालती सुद्धा हसताना दिसते. त्यानंतर प्रणित मालतीला हॅलो करताना दिसतो. अशाप्रकारे 'बिग बॉस १९' संपल्यावर अनेक महिन्यांनी मालती आणि प्रणित एकमेकांसोबत दिसल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
'बिग बॉस १९'शी जोडलेल्या एका प्रायोजकाने दुबईत एका भव्य सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी गौरव खन्ना त्याची पत्नी आकांक्षा, तर अशनूर कौर तिच्या आईसोबत दुबईला रवाना झाले. विमानतळावर या सर्व मित्रमंडळींनी एकत्र फोटो काढले आणि पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशनूरने इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर करत लिहिले की, "आमच्या पॉझिटिव्ह गँगचा अर्धा भाग... अभिषेक बजाज, नगमा मिराजकर आणि मृदुल तिवारी यांची खूप आठवण येत आहे.