Prajakta Mali : सोशल मीडियावर 'नो अपडेट्स' म्हणत प्राजक्ताने केलेली पोस्ट चर्चेत, प्राजूला झालंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:51 IST2023-06-05T16:50:16+5:302023-06-05T16:51:39+5:30

प्राजक्ता म्हणते, मी माझं आयुष्य...

prajakta mali marathi actress shared photo on social media saying no updates life is mysterious | Prajakta Mali : सोशल मीडियावर 'नो अपडेट्स' म्हणत प्राजक्ताने केलेली पोस्ट चर्चेत, प्राजूला झालंय काय?

Prajakta Mali : सोशल मीडियावर 'नो अपडेट्स' म्हणत प्राजक्ताने केलेली पोस्ट चर्चेत, प्राजूला झालंय काय?

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) सोशल मीडियावरील वावर अधिक आहे. कामाबद्दलची माहिती असो किंवा तिचे नवीन नवीन फोटो तिचं सोशल मीडिया अकाऊंट कायम अॅक्टिव्ह असतं. लाडक्या प्राजूचे काही अपडेट्स दिसले नाही की चाहते लगेच कुठे गायब आहेस असे प्रश्न विचारतात. पण आता प्राजक्ताने खरोखर सोशल मीडियाबाबतीत एक निर्णय घेतलाय असं दिसतंय. काय आहे तो निर्णय बघा.

प्राजक्ताने काही तासांपूर्वीच फोटो शेअर केले आहेत. ऑफ शोल्डर प्रिंटेड क्रॉप टॉप आणि पँट या आऊटफिटमध्ये तिने काही फोटो पोस्ट केलेत. तर केसांचा बन केला आहे आणि बटा सोडल्या आहेत. नेहमीप्रमाणेच प्राजक्ता स्टायलिश दिसतेय. तसंच एरवी तिच्या फोटोंना रोमँटिक कॅप्शन असतं. पण या फोटोंना दिलेलं कॅप्शन वाचून चाहत्यांना प्रश्न पडलेत. प्राजक्ताने लिहिले, "मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत आहे..रहस्यमय!" 

प्राजक्ताने असं कॅप्शन का दिलं असावं असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. प्राजूच्या आयुष्यात असं काय गूढ आहे असं चाहते विचारत आहेत. प्राजक्ताने कॅप्शनमध्ये 'हॅशटॅग नो अपडेट्स ऑन सोशल मीडिया' असंही लिहिलंय. नेहमी सतत सोशल मीडियावर असलेली प्राजक्ता आता अचानक नो अपडेट्ल का म्हणतेय असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत. आता प्राजक्ता खरंच सोशल मीडियावरुन गायब होणार का किंवा चाहत्यांना ती प्रश्नांची उत्तरं देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. तसंच तिचा 'प्राजक्तराज' हा स्वत:चा ज्वेलरी ब्रँडही आहे. याच्या प्रमोशमध्येही ती व्यस्त असते. तरी वेळात वेळ काढून ती सोशल मीडियावर अपडेट्स देत असते. मग अचानक प्राजूचे अपडेट्स बंद होणार का हे लवकरच कळेल.

Web Title: prajakta mali marathi actress shared photo on social media saying no updates life is mysterious