प्राजक्ता गायकवाडची पहिली रसोई! लग्नानंतर सासरी बनवला हा खास पदार्थ, नवऱ्यानेही केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:28 IST2025-12-14T11:27:38+5:302025-12-14T11:28:00+5:30
लग्नानंतर प्राजक्ताने पहिल्यांदाच सासरी खास पदार्थ बनवला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

प्राजक्ता गायकवाडची पहिली रसोई! लग्नानंतर सासरी बनवला हा खास पदार्थ, नवऱ्यानेही केली मदत
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्राजक्ताने शंभुराज खुटवड यांच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर प्राजक्ताने पहिल्यांदाच सासरी खास पदार्थ बनवला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
लग्नानंतर प्राजक्ताची पहिली रसोई नुकतीच पार पडली. पहिल्या रसोईसाठी प्राजक्ताने सासरी खास पदार्थ बनवला. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी प्राजक्ताच्या नवऱ्यानेही तिला साथ दिली. प्राजक्ताने सासरी पहिल्या रसोईला गुलाबजाम बनवले होते. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. व्हिडीओत प्राजक्ता गुलाबजाम बनवताना दिसत आहे. तिला घरातील इतर सदस्यही मदत करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. तिने 'आई माझी काळूबाई' या मालिकेतही काम केलं आहे. 'लॉकडाऊन लग्न', 'सिंगल' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. नुकतंच तिचा 'स्मार्ट सुनबाई' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.