प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडे गुडन्यूज! लग्नाच्या तीन वर्षानंतर होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:58 IST2026-04-12T17:38:57+5:302026-04-12T17:58:03+5:30

आई तू होणार गं...! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ३ वर्षांनी घरी पाळणा हलणार

popular actress swati rajput and saurabh goyal announce pregnancy share heartwarming post  | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडे गुडन्यूज! लग्नाच्या तीन वर्षानंतर होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडे गुडन्यूज! लग्नाच्या तीन वर्षानंतर होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Television Actress: यंदाचं वर्ष हे कलाकारांसाठी खास ठरलं आहे. कोणी नवीन घर घेतलं, कुणी नवी गाडी तर काहींच्या घरात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. या अभिनेत्रीचं नाव स्वाती राजपूत आहे. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. 


अभिनेत्री स्वाती राजपुतने २०११ मध्य 'लाईफ ओके' तसेच 'तुम देना साथ मेरा' यांसारख्या मालिकांमधून काम करत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.त्यानंतर तिने  अमृता, 'इस प्यार को क्या नाम दू', 'ये झुकी झुकी नजर' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. आता लवकरच अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

स्वातीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलंय, 'आमचं छोटंसं प्रेम लवकरच येणार आहे.' यासोबतच तिने काही हार्ट आणि इमोजीसुद्धा शेअर केले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचा पती सौरभ गोयलसोबत पोज देताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

दरम्यान, स्वाती राजपुत आणि तिचा पती सौरभ यांची पहिली भेट कामाच्या निमित्ताने झाली.  नंतर या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि मग त्यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण झालं. अखेर २०२३ मध्ये स्वाती आणि सौरभने लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या तीन वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

Web Title : टीवी अभिनेत्री स्वाति राजपूत ने शादी के तीन साल बाद गर्भावस्था की घोषणा की।

Web Summary : 'तुम देना साथ मेरा' के लिए जानी जाने वाली अभिनेत्री स्वाति राजपूत शादी के तीन साल बाद अपने पति सौरभ गोयल के साथ अपने पहले बच्चे की उम्मीद कर रही हैं। दंपति ने इंस्टाग्राम पर मैटरनिटी तस्वीरें साझा कीं, जिन्हें प्रशंसकों और सहयोगियों से बधाई मिली।

Web Title : TV actress Swati Rajput announces pregnancy after three years of marriage.

Web Summary : Actress Swati Rajput, known for 'Tum Dena Saath Mera,' is expecting her first child with husband Saurabh Goyal after three years of marriage. The couple shared maternity photos on Instagram, receiving congratulations from fans and colleagues.