अभिनेत्री पूर्वा गोखलेची आई माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत साकारते ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:51 IST2019-10-24T19:50:29+5:302019-10-24T19:51:23+5:30

पूर्वाची आई झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

poorva gokhale mother essaying role in zee marathi mazya navryachi bayko | अभिनेत्री पूर्वा गोखलेची आई माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत साकारते ही भूमिका

अभिनेत्री पूर्वा गोखलेची आई माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत साकारते ही भूमिका

ठळक मुद्देया महाजनी काकूंच्या भूमिकेत अभिनेत्री कांचन गुप्ते असून त्या पूर्वा गोखलेच्या आई आहेत. कांचन गुप्ते यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे.

पूर्वा गोखलेने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने कोई दिल में है, कहानी घर घर की यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची कुलवधू या मराठी मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. पूर्वाने मराठी चित्रपटासृष्टीत तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तिची आई झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

माझी नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाच्या सोसायटीत राहाणारे महाजनी काका आणि काकू तुम्हाला चांगलेच माहीत असतील... त्यांचा मुलगा परदेशात असल्याने ते राधिकालाच आपली मुलगी मानतात. राधिकाचे महाजनी काका-काकू यांच्यासोबत असलेले नाते प्रेक्षकांना खूपच आवडते. या महाजनी काकूंच्या भूमिकेत अभिनेत्री कांचन गुप्ते असून त्या पूर्वा गोखलेच्या आई आहेत. कांचन गुप्ते यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नाटकांप्रमाणेच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी जावई विकत घेणे आहे, घाडगे अँड सून या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

पूर्वा गोखलेचे लग्न केदार गोखले यांच्यासोबत झाले असून ते बिझनेसमन आहेत. पूर्वा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली राणी सईबाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही मालिका आजही टिआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. 

Web Title: poorva gokhale mother essaying role in zee marathi mazya navryachi bayko