थेट इन्स्टाग्रामवर मेसेज अन्...; मराठी अभिनेत्रीकडे अज्ञाताकडून विचित्र मागणी; नेमकं प्रकरण काय?
By सुजित शिर्के | Updated: March 17, 2025 15:46 IST2025-03-17T15:43:17+5:302025-03-17T15:46:59+5:30
सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील एक प्रभावी माध्यम आहे.

थेट इन्स्टाग्रामवर मेसेज अन्...; मराठी अभिनेत्रीकडे अज्ञाताकडून विचित्र मागणी; नेमकं प्रकरण काय?
Arti More:सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील एक प्रभावी माध्यम आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील एखाद्या कामापेक्षा सोशल मीडियावर अपडेट राहणं अनेकांसाठी महत्त्वाचे झालंय. परंतु या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेसुद्धा आहेत. अलिकडेच्या काळात यामुळेच अनेक फसवणूकीचे प्रकार उघड झाले आहेत. सायबक क्राईमचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री आरती मोरेने (Arti More) सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आरती मोरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत विचित्र अनुभव शेअर केला आहे. सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीकडून आपल्याला मेसेज विचित्र आल्याचा तिने सांगितलं आहे. शिवाय चाहत्यांना सावध राहण्याचं तिने आवाहन सुद्धा केलं आहे. त्या अज्ञात व्यक्तीने थेट अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर मेसेज करत म्हटलंय, "दीदी मला तुम्ही एक मदत करु शकता का तुम्ही ऐश्वर्या चौधरीला ओळखता का जर तुम्ही तिला ओळखत असाल तर कृपया दीदी मला तिचा नंबर पाठवाल का तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. दीदी जर तुम्ही तिला ओळखत असाल तर नंबर सेंड करा. कृपया दीदी माझा नंबर ब्लॉक करु नका. तुम्हीच माझी शेवटची आशा आहात त्यामुळे याबद्दल मी तुम्हाला विचारतो आहे." असा मेसेज अभिनेत्रीला त्या अज्ञात व्यक्तीने केला आहे.
हाच मेसेज आरती मोरेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करत म्हटलंय, "तुम्हाला माझ्या नावाने असा मेसेज येत असेल तर प्लीज त्या व्यक्तीला ब्लॉक करा. मला पण याबद्दल काहीच क्ल्यू नाही. कृपया अशा गोष्टींची तक्रार करा." असं आरतीने या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री आरती मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'जय मल्हार', 'अस्मिता',' दिल दोस्ती दोबारा','गुलमोहर' या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली. 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकातली तिची भूमिका विशेष गाजली.