न्यायाच्या लढाईत वल्लरीला मिळणार इंदूची साथ! 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'इंद्रायणी' मालिकेचा महासंगम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:00 IST2025-02-14T15:59:40+5:302025-02-14T16:00:02+5:30
पिंगा गर्ल्स आणि बाल कीर्तनकार इंदू मिळून सुमनचा पर्दाफाश करणार आहेत. न्यायाच्या लढाईत वल्लरीला इंदूची साथ मिळणार आहे.

न्यायाच्या लढाईत वल्लरीला मिळणार इंदूची साथ! 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'इंद्रायणी' मालिकेचा महासंगम
कलर्स मराठीवर हा रविवार इंदू आणि वल्लरीसोबत होणार आहे खास कारण भक्तीला मिळणार आहे मैत्रीची साथ. पिंगा गर्ल्स आणि बाल कीर्तनकार इंदू मिळून सुमनचा पर्दाफाश करणार आहेत. न्यायाच्या लढाईत वल्लरीला इंदूची साथ मिळणार आहे. मनोजच्या निर्दोषत्वासाठी पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात वल्लरी आणि तिच्या मैत्रिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, पुरावे शोधण्यात त्यांना आलेल्या अपयशयाने वल्लरी खचून गेली आहे, अशा परिस्थितीत इंद्रायणीच्या कीर्तनातून तिला नवी दिशा मिळणार आहे.
वल्लरी इंद्रायणीला घरी घेऊन येते, पण तिच्या या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे, यावर तिच्या मैत्रिणी संभ्रमात आहेत. दुसरीकडे, मनोजविरोधात अटेम्प्ट टू मर्डरचा आरोप लावण्याचा कट शिजत असून, सुमनने पोलिसांकडे नव्या केसची तयारी सुरू केली आहे. अशा संकटाच्या क्षणी इंद्रायणीच्या येण्याने ही कथा वेगळे वळण घेणार आहे. तिच्या विचारसरणीने आणि अध्यात्मिक ताकदीने हा महासंगम खास ठरणार असून सत्य बाहेर येईल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच इंदू आणि वल्लरी एकमेकींना विशेष भेट देणार आहेत. काय असेल ही भेट? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आणि 'इंद्रायणी' मालिकेचा महासंगम. दोन तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारी दुपारी 1 वा. आणि संध्याकाळी 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.
वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणाली, "मला जेव्हा कळालं महासंगम विशेष भाग होणार आहे आणि तो म्हणजे इंद्रायणी मालिकेसोबत तेव्हा मी खूप उत्सुक झाले. कारण हा आमचा दुसरा महासंगम असणार आहे. जेव्हा कळालं दोन तासाचा महासंगम असणार आहे तेव्हा जरा टेन्शन आलं कारण सोम ते रवि आमच्या मालिकांचं शूट असतं त्यामुळे कसं होणार, कसा टाईम मॅनेज होणार हे जरा चिंताजनक होतं. फक्त दोन दिवसांत आम्ही महासंगमचं शूट पूर्ण केलं. त्यात इंद्रायणीचे कीर्तनदेखील होते. ती एकटीच दोन-तीन पानांचे संवाद बोलत होती. मला खूपचं कौतुक वाटतं तिचं. या सगळ्या मुलांसोबत वेळ घालवत असताना आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणीत गेलो. दोन दिवस सेटवर मज्जा, मस्ती, धम्माल होती. आमची टीम इतकी efficient होती कि, त्यामुळे कामाचा लोड अजिबातच जाणवला नाही. पण, प्रेक्षकांना हा महासंगम भाग बघताना खूप मज्जा येणार आहे हे नक्की. आता वल्लरी इंदूच्या साथीने कसं काय मनोजवर आलेल्या संकंटातून त्याला बाहेर काढणार हे बघा १६ फेब्रुवारीला." आता या रविवारी पिंगा गर्ल्स आणि इंदूच्या साथीने वल्लरी सुमनचा डाव कसा उधळून लावणार ? वल्लरी सुमनला तिची जागा कशी दाखवून देणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत .