'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ; पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:00 IST2023-01-05T17:54:18+5:302023-01-05T18:00:04+5:30
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा मालिका लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ; पार पडला साखरपुडा
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा मालिका लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतील कीर्तीच्या आयपीसी ट्रेनिंग ट्रॅकने तर भरपूर लोकप्रियता मिळवली होती.
लीकडेच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका बंद झाली असली तरी मालिकेतील कलाकार आजही तितकेच लोकप्रिय आहेत. नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील जान्हवीची भूमिका अभिनेत्री भूमिजा पाटीलने साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. भूमिजाचा नुकतंच साखरपुडा उरकला आहे. भूमिजाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत. ही बातमी समोर येताच अभिनेत्रीवर शुभेच्छाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
भूमिजाचा साखरपुडा अगदी शाही थाटात पार पाडला. यावेळी इंडस्ट्रीतील तिचे काही खास मित्रा उपस्थित होते. हिरव्या रंगाच्या साडीत भूमिजा खूप सुंदर दिसत होती. भूमिजा पाटीलच्या होणाऱ्या नवराचे नाव पराग आहे. अभिनेत्रीने परागसोबत आपले दुबई ट्रिपचे फोटोसुद्धा याआधी शेअर केले होते. पराग हा जिम ट्रेनर आहे. भूमिजा सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडत आहे.