Pawandeep and Arunita Kanjilal song : तेरे नैना..., पवनदीप व अरूणिताचं रोमॅन्टिक गाणं पाहिलंत का? तासाभरात मिळाले इतके व्ह्युज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:28 IST2022-12-23T16:28:14+5:302022-12-23T16:28:56+5:30
Pawandeep and Arunita Kanjilal song : ‘तेरे नैना’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच, या गाण्यानं चाहत्यांना वेड लावलं आहे.

Pawandeep and Arunita Kanjilal song : तेरे नैना..., पवनदीप व अरूणिताचं रोमॅन्टिक गाणं पाहिलंत का? तासाभरात मिळाले इतके व्ह्युज
छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’चा 12 वा सीझन आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय सीझन ठरला. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक त्यांच्या दमदार परफॉर्मेन्समुळे चर्चेत राहिला. तर, काही स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले. यातलीच एक जोडी म्हणजे पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal ). हा शो सुरु झाल्यापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नाही तर हा शो संपल्यानंतरही ही चर्चा थांबली नाही. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच मैत्री पलिकडचं नातं असल्याचं म्हटलं जातं. आता या जोडीचं एक रोमॅन्टिक गाणं रिलीज झालं आहे.
‘तेरे नैना’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच, या गाण्यानं चाहत्यांना वेड लावलं आहे. युट्युबवर अपलोड करण्यात आलेलं हे गाणं पवनदीप व अरूणिता दोघांनी गायलं आहे. यात दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री वेड लावणारी आहे. काहीच तासांत या व्हिडीओला 11 हजारांवर लाईक्स मिळाले आहेत. तर 29 हजारांवर व्ह्युज मिळाले आहेत.
इंडियन आयडल 12 हा शो कधीच संपला. पण पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. अरूदीप नावाने लोकप्रिय झालेली ही जोडी नात्यात असल्याच्या चर्चा आहेत. खरं तर शो सुरू असतानाच अरूणिता व पवनदीप यांच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची चर्चा सुरू झाली होती. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असंच दोघंही सांगत होते. शो संपला, त्यानंतरही आम्ही फक्त मित्र आहोत, असंच दोघं सांगत राहिले. आता पुन्हा एकदा अरूदीपच्या नात्याची चर्चा होताना दिसतेय.