पवित्रा पुनिया ३९व्या वर्षी बिझनेसमॅनशी बांधणार लग्नगाठ; एजाजसोबत ब्रेकअपनंतर काही महिन्यांतच मिळालं खरं प्रेम
By कोमल खांबे | Updated: October 22, 2025 09:18 IST2025-10-22T09:18:07+5:302025-10-22T09:18:26+5:30
एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता पवित्रा पुनियाला तिचं खरं प्रेम मिळालं आहे. पवित्रा पुनिया लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

पवित्रा पुनिया ३९व्या वर्षी बिझनेसमॅनशी बांधणार लग्नगाठ; एजाजसोबत ब्रेकअपनंतर काही महिन्यांतच मिळालं खरं प्रेम
टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम पवित्रा पुनिया तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा होती. 'बिग बॉस'च्या घरात जवळ आलेले ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता पवित्रा पुनियाला तिचं खरं प्रेम मिळालं आहे. पवित्रा पुनिया लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
पवित्राने ती एका व्यक्तीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. आता तिने तिचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे. पवित्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं आहे. पवित्रा पुनियाला तिच्या बॉयफ्रेंडने समुद्रकिनारी फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्याचं दिसत आहे. "प्रेमात पडले...लवकरच मिसेस होईन...", असं कॅप्शन पवित्राने या फोटोंना दिलं आहे.
पवित्राचा होणारा नवरा एक बिझनेसमॅन आहे. अभिनेत्रीने त्याच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण, त्याचं कुटुंब अमेरिकेत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी अमेरिकेत जाणार असल्याचं पवित्राने म्हटलं होतं. "तो अभिनेता नाहीये. त्याचा या इंडस्ट्रीशी संबंधच नाही. तो अमेरिकेत बिझनेस करतो. खूप चांगला आणि प्रेमळ माणूस आहे. काही काळापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत आणि हे नातं खूपच खास आहे", असं पवित्रा हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.