पवित्रा पुनिया पुन्हा प्रेमात, अमेरिकेतील बिझनेसमनला करतेय डेट; म्हणाली, "यावर्षीची दिवाळी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 15:13 IST2025-10-21T15:12:40+5:302025-10-21T15:13:15+5:30
एजाज खानशी ब्रेकअपनंतर पवित्राच्या आयुष्यात आलं नवं प्रेम

पवित्रा पुनिया पुन्हा प्रेमात, अमेरिकेतील बिझनेसमनला करतेय डेट; म्हणाली, "यावर्षीची दिवाळी..."
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान यांचं ब्रेकअप खूप चर्चेत होतं. बिग बॉसमधये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नंतरही त्यांच्यात रोमान्स सुरुच होता. दोघं लग्न करतील अशीही चर्चा होती. मात्र अचानक त्यांचा मार्ग वेगळा झाला. धर्माच्या कारणांमुळेही त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. आता पवित्रा पुनियाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं आहे. अभिनेत्रीने नुकताच याचा खुलासा केला.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा पुनिया म्हणाली, "हो मी परत प्रेमात पडले आहे. यावर्षीची दिवाळीही खूप खास आहे कारण मी त्याच्या कुटुंबासोबत साजरी करणार आहे. मी परदेशात जाणार आहे कारण तो आणि त्याचं कुटुंब तिथेच आहे. यावर्षी मला माझ्या कुटुंबासोबत दिवाळीला राहता येणार नाही याचं थोडं दु:ख आहे पण मी त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठीही उत्सुक आहे."
तो व्यक्ती नक्की आहे तरी कोण? यावर पवित्रा म्हणाली,"तो अभिनेता नाहीये. त्याचा या इंडस्ट्रीशी संबंधच नाही. तो अमेरिकेत बिझनेस करतो. खूप चांगला आणि प्रेमळ माणूस आहे. काही काळापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत आणि हे नातं खूपच खास आहे."
पवित्रा पुनिया २ वर्षांपासून टीव्हीपासूनही दूर आहे. आता तिची 'रिएलिटी राजनीज ऑफ द जंगल २'च्या दुसऱ्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे.