Kaisi Yeh Yaariaan: अखरे प्रतीक्षा संपली! 'कै ये यारियां' चा चौथा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:23 IST2022-05-20T18:21:29+5:302022-05-20T18:23:24+5:30
पार्थ समथान आणि निती टेलरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कैसी ये यारियां' या लोकप्रिय शोचा चौथा सीझन लवकरच येणार आहे.

Kaisi Yeh Yaariaan: अखरे प्रतीक्षा संपली! 'कै ये यारियां' चा चौथा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पार्थ समथान आणि निती टेलरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा त्यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'कैसी ये यारियां' या लोकप्रिय शोचा चौथा सीझन येणार आहे, ज्यामध्ये या दोघांची जोडी दिसणार आहे. ही चौथी वेळ आहे जेव्हा दोघांची जोडी पडद्यावर दिसणार आहे. याआधी या शोच्या तीन सीझनमध्ये या दोघांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कैसी ये यारियां या शोच्या चाहत्यांची कमी नाही. विशेषत: तरुणांमध्ये या शोला खूप पसंती मिळत आहे. या शोचे तीन सीझन याआधीच धमाकेदार झाले आहेत. कैसी ये यारियां या शोचे पहिले दोन सीझन एमटीव्हीवर आणि तिसरा सीझन वूटवर प्रसारित झाला. तिसरा सीझन संपताच चाहत्यांनी चौथ्या सीझनची मागणी सुरू केली. आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
कैसी ये यारियांच्या आगामी सीझनमध्ये काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत. माणिक (पार्थ) आणि नंदिनी (नीती टेलर) यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करतील. शोच्या चौथ्या सीझनमध्ये पार्थ समथान, नीती टेलर, किश्वर मर्चंट, अयाज खान आणि मेहुल निसार यांच्यासह अनेक दमदार स्टार्स शोमध्ये दिसणार आहेत. या लोकप्रिय शोमध्ये आयुष शोकीन, सागर पारेख आणि पलाश तिवारी यांनीही एंट्री केली आहे.
शोचा फोकस मनन म्हणजेच माणिक मल्होत्रा आणि नंदिनी मूर्ती यांच्यावर असेल. त्यांची प्रेमकहाणी नव्या पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. पार्थ समथान म्हणतो, “एखादा शो वर्षानुवर्षे प्रासंगिक राहणे दुर्मिळ आहे. आणि कैसी ये यारियां अनेक दशकांपासून असे करण्यात यशस्वी होत आहे. प्रेक्षक या सीझनला त्याच्या मागील सीझनप्रमाणेच प्रचंड प्रेमाचा वर्षाव करतील.
या शोबद्दल नीती टेलरम्हणाली, “मी सुरुवातीपासूनच शोचा भाग आहे आणि आम्हाला ‘कैसे ये यारियां’मधील # MaNan आणि नंदिनीला मिळालेल्या प्रेमाची कल्पना करता येत नाही. मला आशा आहे की, प्रेक्षकांना आमचा शो आवडेल आणि ते आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतील.”