मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 15:24 IST2025-10-21T15:22:26+5:302025-10-21T15:24:55+5:30
पराग त्यागीने शेफालीच्या मृत्यूनंतरचा अनुभव सांगितला आहे. परागला अजूनही घरात शेफालीच्या सहवास जाणवतो. आणि तिचा भासही होतो.

मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. तिच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पत्नीच्या धक्क्यातून अद्याप तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी सावरू शकलेला नाही. पराग शेफालीबरोबरच्या आठवणींना व्हिडीओतून उजाळा देत असतो. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने शेफालीच्या मृत्यूनंतरचा अनुभव सांगितला आहे. परागला अजूनही घरात शेफालीच्या सहवास जाणवतो. आणि तिचा भासही होतो.
पराग म्हणाला, "माझ्या घरात सगळीकडे तिचे फोटो लावले आहेत. संध्याकाळी आमच्या घरात दिवे लावले जातात. मी दिवा लावण्यासाठी गेलो तेव्हा मला शेफालीची खूप आठवण आली. तिचा फोटो पाहून मी रडू लागलो. रडत रडत मी तिला म्हणालो की बाबू तू मला सोडून का गेलीस? तेव्हाच घरात अचानक कापूरचा सुवास दरवळला. पण, घरात कुठेच कापूर जळत नव्हता. शेफालीला कापूरचा वास खूप आवडायचा. ती रोज संध्याकाळी कापूर लावायची".
"मी घरात सगळीकडे पाहिलं की कापूरचा वास नक्की कुठून येतोय. पण, कुठेच मला कापूर दिसला नाही. त्यानंतर मी हसत विचारलं बाबू तू इथेच आहेस ना. तेव्हा मला एक वेगळीच एनर्जी जाणवली. माझे केस हवेत उडत होते. ती अशी फिलिंग होती की मला शब्दांत सांगता येणार नाही", असंही पराग त्यागीने सांगितलं.