'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर प्रतीकची 'झिंगाट परफॉर्मन्स'च्या दुसऱ्या हॅटट्रीककडे वाटचाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:38 IST2022-01-19T16:31:58+5:302022-01-19T16:38:18+5:30
'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्राला उत्तम १० स्पर्धक मिळाले आहेत

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर प्रतीकची 'झिंगाट परफॉर्मन्स'च्या दुसऱ्या हॅटट्रीककडे वाटचाल!
सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्राला उत्तम १० स्पर्धक मिळाले आहेत आणि आता विजेतेपदासाठी सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. नाशिक, निफाडचा प्रतीक सोळसे त्याच्या दमदार आवाजाने परीक्षकांची मनं जिंकतो आहे. प्रतीकची झिंगाट परफॉर्मन्सची हॅटट्रीक आत्ताच झाली होती आणि या लोकसंगीत विशेष आठवड्यातही त्याला झिंगाट मिळाला आहे. दुसऱ्या हॅटट्रीककडे त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे.
लोकसंगीत विशेष आठवड्यात प्रतीकने छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाड्यातून मानाचा मुजरा केला. गायक नंदेश उमप यांनी प्रतीकच्या सादरीकरणाचं आणि आवाजाचं कौतुक केलं. दुसऱ्या हॅटट्रीकडे प्रतीकची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या आठवड्यात तो त्याच्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकू शकेल का, ही उत्सुकतेची बाब आहे.