...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:18 IST2023-03-27T16:26:17+5:302023-03-27T17:18:46+5:30
अभिनेता सिद्धार्थ जाधवनेआपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.

...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) स्टेजवर परफॉर्मन्स देत अशोक मामांना ट्रिब्युट दिलं. इतकंच नाही तर परफॉर्मन्स संपल्यानंतर त्याने अशोक मामांच्या गळ्यात फुलांची माळ घालत साष्टांग दंडवतही घातले त्यावेळी तिथे उपस्थित सारेच भावुक झाले होते. या सोहळ्यानंतर अशोक सराफ यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.गेल्या अनेक दिवसांपासून हा पुरस्कार सोहळा चर्चेत होता. आपल्या सर्वांचे लाडके मामा अर्थात अभिनय सम्राट अशोक सराफ ( Ashok Saraf) यांना या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तत्पूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav ) आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.
निवेदिता सराफ यांची पोस्ट
या सोहळ्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्टमधून व्यक्त केल्या. निवेदिता यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अशोक मामांना सर्व कलाकार मिळून पुरस्कार देतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबरच त्यांनी लिहिलं आहे की, 'मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल...'