सोशल मीडियावर झाली पोलखोल, निशा रावलने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस, फोटो पाहून चाहत्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:29 IST2021-06-16T19:23:57+5:302021-06-16T19:29:47+5:30
करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा कविश आहे.

सोशल मीडियावर झाली पोलखोल, निशा रावलने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस, फोटो पाहून चाहत्यांचा संताप
टीव्ही इंडस्ट्रीची सर्वात क्युट जोडी निशा रावल आणि करण मेहरा यांच्यात झालेल्या वादाची चर्चा अजूनही सुरुच आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप लावत त्यांच्या ख-या नात्याचा चेहरा जगासमोर आणला. नुकताच निशाने मुलगा कविशचा वाढदिवस मोठ्या थाटात सेलिब्रेट केला. निशाच्या जवळच्या मित्रमंडळीनी देखील कविशच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. कविशच्या वाढदविसाच्या दिवशी सगळेच उपस्थित होते मात्र करण मेहरा या पार्टीला हजर नव्हता. एरव्ही प्रत्येक गोष्ट निशा सोशल मीडियावर शेअर करताना दिसायची.
आता मात्र ती सोशल मीडियावर कोणत्याच गोष्टी शेअर करताना दिसत नाही. कविशच्या बर्थ डे पार्टीचे फोटोसुद्धा तिने शेअर केले नव्हते. मात्र निशाचा चांगला मित्र प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्माने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहत्यांचा मात्र चांगलाच संताप झाला. निशा मस्त सेलिब्रेशनमध्ये मग्न असल्याचे पाहून चाहत्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले. इतकंच नाहीतर निशाने करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचे आरोप खोटे असल्याचे चाहते सांगत आहेत.
मुलाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनवेळी करण मेहराची ईच्छा असूनही तो जाऊ शकला नाही. शेवटी करण मेहराने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कविशचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. करणने फोटो शेअर करत भावूक पोस्टही लिहीली होती. टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करणबरोबर हिना खानही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय करण 'बिग बॉस १०' आणि 'नच बलिये ५' मध्येही दिसला आहे. करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर कविशचा जन्म झाला तो चार वर्षाचा आहे.