निक्की तांबोळीने घातला इतका छोटा टॉप, सोशल मीडिया यूजर्सने केलं तिला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:30 IST2021-11-29T17:30:17+5:302021-11-29T17:30:43+5:30
Nikki Tamboli : निक्की तांबोळी तिच्या बोल्ड अंदाजामुळेही नेहमीच चर्चेत राहते. ती अलिकडेच एका इव्हेंटला पोहोचली होती आणि यावेळी ती फारच विचित्र कपड्यांमध्ये दिसली.

निक्की तांबोळीने घातला इतका छोटा टॉप, सोशल मीडिया यूजर्सने केलं तिला ट्रोल
निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. अलिकडे तिचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या बोल्ड अंदाजामुळेही नेहमीच चर्चेत राहते. ती अलिकडेच एका इव्हेंटला पोहोचली होती आणि यावेळी ती फारच विचित्र कपड्यांमध्ये दिसली. ज्यामुळे तिला सोशल मीडिया यूजर्सनी ट्रोलही केलं.
बिग बॉस फेम निक्की तांबोळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. कधी आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे तर कधी आपल्या बोल्ड फोटोज आणि व्हिडीओजमुळे निक्की नेहमीच चर्चेत असते. आता ती तिच्या बोल्ड आउटफिटमुळे चर्चेत आली आहे.
हा व्हिडीओ बिग बॉस फेम आर जे शार्दुल पंडित यांच्या बर्थ डे पार्टी दरम्यानचा आहे. या पार्टीत निक्की तांबोळी बोल्ड अंदाजात दिसून आली. सर्वांच्या नजरा यावेळी तिच्यावर खिळल्या होत्या. पण हे कपडे तिला जरा जास्तच टाइट झाल्याचं दिसून आलं. ती या कपड्यांमध्ये सहज वाटली नाही.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, निक्की ब्लॅक कलरच्या शॉर्ट टॉप आणि रिप्ड ब्लॅक जीन्समध्ये दिसत आहे. या आउटफिटमध्ये निक्की फारच बोल्ड दिसत आहे. तिचा टॉप फारच जास्त शॉर्ट आहे आणि जीन्स फार जास्त रिप्ड म्हणजे फाटलेली आहे. व्हिडीओवर कमेंट करत लोक निक्कीला ट्रोल करत आहे. कुणी तिच्या कपड्यांवर कमेंट करत आहे तर कुणी तिच्या पोजवर कमेंट करत आहेत.