"चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...", विनायक माळीसाठी निक्कीचा आगरी स्टाइल उखाणा, 'शिट्टी वाजली रे'मधील व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:36 IST2025-05-03T13:36:00+5:302025-05-03T13:36:48+5:30

'शिट्टी वाजली रे'मधील निक्की तांबोळी आणि विनायकचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की आगरी भाषेतून विनायकसाठी उखाणा घेताना दिसत आहे.

nikki tamboli ukhana for vinayak mali shitti vajali re video | "चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...", विनायक माळीसाठी निक्कीचा आगरी स्टाइल उखाणा, 'शिट्टी वाजली रे'मधील व्हिडिओ समोर

"चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...", विनायक माळीसाठी निक्कीचा आगरी स्टाइल उखाणा, 'शिट्टी वाजली रे'मधील व्हिडिओ समोर

स्टार प्रवाह वाहिनीवर 'शिट्टी वाजली रे' हा सेलिब्रिटी कुकिंग शो नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांचे कुकिंग टॅलेंट दाखवताना दिसत आहेत. या शोमध्ये बिग बॉस फेम निक्की तांबोळी आणि सोशल मीडिया रीलस्टार विनायक माळीदेखील सहभागी झाले आहेत. 'शिट्टी वाजली रे'मध्ये निक्की आणि विनायकची जोडी जमली आहे. ते दोघेही या शोमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. 

'शिट्टी वाजली रे'मधील निक्की तांबोळी आणि विनायकचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की आगरी भाषेतून विनायकसाठी उखाणा घेताना दिसत आहे. "चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...घास भरवते मेल्या तोंड कर इकडं", असा उखाणा निक्कीने विनायकसाठी घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


'शिट्टी वाजली रे'मध्ये विनायक माळी, निक्की तांबोळी, मधुराणी गोखले, रुपाली भोसले, घनश्याम दरवडे, प्रियदर्शन जाधव, धनंजय पोवार, हेमंत ढोमे, गौतमी पाटील, आशिष पाटील, स्मिता गोंदकर, पुष्कर क्षोत्री हे कलाकार आहेत. 

Web Title: nikki tamboli ukhana for vinayak mali shitti vajali re video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.