'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:39 IST2025-10-08T11:38:18+5:302025-10-08T11:39:07+5:30
निक्की तांबोळी-धनश्री वर्मामध्ये कोल्ड वॉर

'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
'राईज अँड फॉल' रिएलिटी शोची सध्या चर्चा आहे. धनश्री वर्मा एकीकडे युजवेंद्र चहलबद्दल बरंच काही बोलत आहे. तर दुसरीकडे अरबाज पटेलला धनश्रीने धोका दिल्याची चर्चा आहे. दरम्यान अरबाजची गर्लफ्रेंड निक्की तांबोळीने नुकतीच शोमध्ये हजेरी लावली. अरबाजला भेटून तिने धनश्री किती खोटारडी आहे याचा खुलासा केला. निक्कीने आता सोशल मीडियावर एकानंतर एक स्टोरी शेअर करत धनश्री वर्मावर निशाणा साधला आहे.
निक्कीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती घरातून गेल्यानंतर धनश्री वर्मा अरबाजशी बोलत असते. 'मी कधीच तुझ्याविरोधात बोलले नाही' असं ती त्याला म्हणते. पुढे निक्की व्हिडिओत पुरावे दाखवते. यासोबत निक्कीने लिहिले,'वफादारी की अदाकारी ना करो हमारे सामने, हम शक्ल से नस्ल पहचानने का हुनर रखते है'. नंतर तिने स्टोरी शेअर करत लिहिले, 'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया खेलते कैसे है..!'
निक्की तांबोळी आणि धनश्री वर्मामधलं कोल्ड वॉर तुफान गाजत आहे. 'निक्की तू धनश्रीची चांगलीच शाळा घेतलीस',' धनश्रीचा खरा चेहरा समोर आला' अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी निक्की आणि अरबाजला पाठिंबा दिला आहे.
'राईज अँड फॉल'शो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ६ सप्टेंबर रोजी शोचा प्रीमियर झाला. 'शार्क टँक'फेम अशनीर ग्रोवर शोचा होस्ट आहे. धनश्री वर्मा, अरबाजसह आदित्य नारायण, अर्जुन बिजलानी, कीकू शारदा, नयनदीप रक्षित सारखे सेलिब्रिटी यामध्ये सहभागी आहेत.