"एखाद्याला रंगावरुन हिणवता, लाज वाटली पाहिजे...", निक्की तांबोळीचा प्रणित मोरेला सपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:09 IST2025-09-29T12:08:15+5:302025-09-29T12:09:15+5:30
प्रणित मोरेसाठी निक्की तांबोळीने केलं सर्वांना आवाहन

"एखाद्याला रंगावरुन हिणवता, लाज वाटली पाहिजे...", निक्की तांबोळीचा प्रणित मोरेला सपोर्ट
'बिग बॉस १९'मध्ये सध्या प्रणित मोरेची चर्चा आहे. काही दिवसांपासून प्रणितला घरातील काही सदस्यांनी त्यांच्या रंगावरुन हिणवलं. तसंच 'तुझ्या खेडेगावात परत जा' अशीही टिप्पणी केली. कुरूपही म्हटलं गेलं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मराठी प्रेक्षक पेटून उठले. कित्येक मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने प्रणितला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यातच आता हिंदी, मराठी बिग बॉस गाजवणारी निक्की तांबोळीही प्रणितच्या सपोर्टमध्ये उतरली आहे.
निक्की तांबोळीने बिग बॉसच्या एपिसोडचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये प्रणितला बसीर कुरुप असं संबोधत आहे. यावरुन निक्की भडकली. तिने लिहिले, 'लाज वाटली पाहिजे बसीर. एखाद्याला त्याच्या रंगावरुन हिणवणं आणि कमेंट करणं हे लज्जास्पद आहे. प्रणित, अख्खा महाराष्ट्र आणि देशभरातली लोक तुझ्यामागे खंबीरपणे उभे आहेत. आपला मराठी माणूस आहे त्याला पाठिंबा द्या. प्रणित तू एकटा त्या सगळ्यांना सामोरा जा. आम्ही आहोत."
निक्की तांबोळीआधी धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, अभिजीत केळकर या बिग बॉसच्या माजी सदस्यांनी आणि मराठी इन्फ्लुएन्सर्सनेही प्रणितला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियालवर प्रणितच्या फॅन पेजेसनेही धुमाकूळ घातला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात घरातून आवेज दरबारचं एलिमिनेशन झालं जे सगळ्यांनाच धक्कादायक वाटलं.