निक्कीने आर्याचं जेवण काढलं, सुरेखा कुडचींचा राग अनावर! म्हणाल्या- "तू घराची मालकीण नाहीयेस"
By देवेंद्र जाधव | Updated: August 24, 2024 10:22 IST2024-08-24T10:21:58+5:302024-08-24T10:22:30+5:30
निक्की तांबोळीने काल जेवणावरुन आर्या जाधवशी वाद घेतला. या प्रकरणावरुन सुरेखा कुडचींनी राग व्यक्त केला (nikki tamboli, aarya jadhav, bigg boss marathi 5)

निक्कीने आर्याचं जेवण काढलं, सुरेखा कुडचींचा राग अनावर! म्हणाल्या- "तू घराची मालकीण नाहीयेस"
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल घरात मोठा वाद झाला. निक्की तांबोळीने आर्याला जेवताना जास्त डाळ घेतल्याने टोकलं. यामुळे आर्या रागाच्या भरात काल जेवलीच नाही. आर्याला सगळ्यांनी समजावलं पण ती ऐकली नाही. दुसरीकडे निक्कीने बडबड करुन हे प्रकरण आणखी वाढवलं. त्यामुळे B टीमने निक्कीवर चांगलाच राग काढला. अखेर बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक आणि अभिनेत्री सुरेखा कुडचींनी याप्रकरणी निक्कीवर संतप्त पोस्ट लिहिली आहे.
सुरेखा कुडचींची निक्कीसाठी पोस्ट
सुरेखा कुडची लिहितात, "मालकीण ... निक्की अग ते घर सर्वांच आहे .. तू मालकीण नाहीयेस ... आणि काय ग तू म्हणशील ती पूर्व दिशा का ? तुझा कैप्टेनसी चा वेळेस सगळ्यांनी तुझ ऐकायचं का तर तू सगळ्यांशी नीट वागते म्हणून आणि अंकिता कॅप्टन असताना तू किती छळलेस गा सगळ्याना आठवतं नाही का बाईई ... नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो ..दुसऱ्या मॅडम काय शांत झाल्यात वाटत कल्पना दिली असावी प्रकरण तापलय शांततेत घे म्हणून .... उद्याची वाट अख्ख महाराष्ट्र पाहतोय भाऊचा धक्का ... या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही ...."
निक्की-आर्यामध्ये नेमकं काय झालं?
काल बिग बॉसच्या घरात निक्कीचा बर्थडे होता. घरातलं वातावरण तसं चांगलं होतं. नंतर जेवणाच्या वेळी आर्याने मोठ्या बाऊलमध्ये तिच्यासाठी डाळ आणि चपाती घेतली. ती बघताच निक्की म्हणाली, तिने मोठ्या बाऊलमध्ये डाळ घेतलीय. कोणाला कमी पडायला नको. बघून घ्या. हे ऐकताच आर्याने चिडून घेतलेली डाळ पुन्हा भांड्यात टाकली आणि चपातीही ठेवल्या. निक्कीने पुढे अखंड बोलत B टीम आणि आर्याला दोष दिला. पुढे अंकिता, पॅडी आणि धनंजयनेही निक्कीला चांगलंच सुनावलं.