"जगातील ८ अब्ज लोकांमध्ये मला तू..." निक्कीनं अरबाजवरील प्रेम केलं व्यक्त, म्हणाली "खूप नशीबवान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:57 IST2025-09-09T16:56:30+5:302025-09-09T16:57:19+5:30

निक्कीनं अरबाजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Nikki Tamboli Expresse Love For Arbaaz Patel And Support His Rise And Fall Show | "जगातील ८ अब्ज लोकांमध्ये मला तू..." निक्कीनं अरबाजवरील प्रेम केलं व्यक्त, म्हणाली "खूप नशीबवान..."

"जगातील ८ अब्ज लोकांमध्ये मला तू..." निक्कीनं अरबाजवरील प्रेम केलं व्यक्त, म्हणाली "खूप नशीबवान..."

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या शोमधील दोघांच्या खेळाचं प्रेक्षकांनी कौतुकही केलं. 'बिग बॉस'च्या घरात असताना निक्की आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा होती.  शो संपल्यानंतरही ही जोडी तुटली नाही. 'बिग बॉस मराठी ५' नंतरही निक्की-अरबाज हे एकमेकांच्या अधिक जवळ आले. आता ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना अनेकदा दिसून येतात. आता निक्कीनं अरबाजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

सध्या अरबाज हा 'राइज अ‍ॅण्ड फॉल' या हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. तर निक्की त्याला पाठिंबा देताना दिसतेय. निक्कीनं इन्स्टाग्रामवर अरबाजसोबतचा एक गोड व्हिडीओ शेअर केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "तू माझा आहेस, म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजते. या जगात ८ अब्ज लोकांमध्ये मला तू सापडलास. ही जणू नियतीच होती असं वाटतं. तू माझ्यासाठी किती परिपूर्ण आहेस याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणि प्रेम आणलं आहेस आणि आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण मी जपते".

पुढे तिनं लिहलं, "मला तुला जिंकताना पाहायचं आहे. तुझी प्रत्येक स्वप्नं तू गाठावीत, तुझ्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तू मात करावी आणि तू यशस्वी व्हावास, हेच माझं स्वप्न आहे. मी तुझी सर्वात मोठी चाहती आहे. फक्त एक आठवण करून देते की, तू कोणताही अडथळा पार करू शकतोस. तू अविश्वसनीय आहेस आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तू नक्कीच यशस्वी होशील. तुला भरपूर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा पाठवतेय. आपण दूर असलो तरी, तू नेहमी माझ्या  हृदयात आहेस. आता तुझी चमकण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आहे अरबाज पटेल. मला तुझी खूप आठवण येतेय", या शब्दात निक्कीनं अरबाजवरील प्रेम व्यक्त केलंय. 


Web Title: Nikki Tamboli Expresse Love For Arbaaz Patel And Support His Rise And Fall Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.