निक्की तांबोळी अरबाजच्या पाठिशी, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, "बाप तो बापच राहणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:59 IST2025-09-07T12:58:51+5:302025-09-07T12:59:33+5:30

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Nikki Tamboli Befitting Reply To Trolls After Supporting Arbaaz Patel In Rise And Fall Show | निक्की तांबोळी अरबाजच्या पाठिशी, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, "बाप तो बापच राहणार"

निक्की तांबोळी अरबाजच्या पाठिशी, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, "बाप तो बापच राहणार"

Nikki Tamboli: 'बिग बॉस मराठी ५' मुळे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) हे कपल घराघरात पोहोचलं. 'बिग बॉस' संपल्यानंतरही दोघांची जोडी आजही चर्चेचा विषय असते. या जोडीचे अनेक चाहतेही आहेत. अशातच निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अरबाज एका नव्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे आणि निक्की त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. पण याचमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला, ज्यावर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

'बिग बॉस मराठी ५' नंतर अरबाज 'राइज ॲण्ड फॉल' (Rise And Fall Show) या हिंदी रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. यावेळी निक्की ही त्याला पाठिंबा देताना दिसली.  निक्कीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अरबाजचा एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, "अरबाज पटेल, माझा हिरो! असाच पुढे जा… कोण कुणाचा बाप आहे, हे आज कळलं. कदाचित काही लोक थोडं कमी डोकं आणि कमी हवाबाजी घेऊन शोमध्ये आले असते. गेम अगदी सोपा होता, पण नको तिथे केलेली हवाबाजीच त्यांना नडली".

निक्कीने अरबाजला पाठिंबा दिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही ट्रोलर्सनी अपशब्दही वापरले. यावर निक्कीने ट्रोलर्सच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांना चांगलेच सुनावले. तिने लिहिले, "मला शिव्या घालून काही होणार नाही… बाप तो बापच राहणार. आपला पराभव पचवायला शिका, चला आता हवा येऊ दे". निक्कीबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' या कुकिंग शोमध्ये पहिली रनर-अप ठरली होती. 

Web Title: Nikki Tamboli Befitting Reply To Trolls After Supporting Arbaaz Patel In Rise And Fall Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.