"...तर अरबाजशी लग्न करेन", निक्की तांबोळीने स्पष्ट केलं; THE 50 शोमध्ये बॉयफ्रेंडविरोधात खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 17:51 IST2026-01-26T17:50:47+5:302026-01-26T17:51:55+5:30

'ती' गोष्ट पूर्ण झाली तरच निक्की तांबोळी अरबाजशी लग्न करणार...

nikki tamboli and boyfriend arbaz patel to enter the 50 show actress talks about marriage and playing opposite boyfriend | "...तर अरबाजशी लग्न करेन", निक्की तांबोळीने स्पष्ट केलं; THE 50 शोमध्ये बॉयफ्रेंडविरोधात खेळणार

"...तर अरबाजशी लग्न करेन", निक्की तांबोळीने स्पष्ट केलं; THE 50 शोमध्ये बॉयफ्रेंडविरोधात खेळणार

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे बिग बॉसमुळे चर्चेत आलेलं कपल आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये दोघं दिसले होते. शोमध्ये दोघं प्रेमात पडले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं रिलेशनशिप टिकून राहिलं. आता दोघंही पुन्हा एका रिएलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. THE 50 या आगामी बहुचर्चित शोमध्ये इतर ४८ स्पर्धकांसोबतच निक्की आणि अरबाज पटेलही सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत निक्कीने या शोविषयी आणि अरबाजसोबत लग्न कधी करणार याविषयीही खुलासा केला.

THE 50 शोमध्ये बॉयफ्रेंड अरबाज पटेलच्याच विरोधात खेळण्याबद्दल झूमशी बोलताना निक्की तांबोळी म्हणाली, "अरबाज माझी ताकद आहे आणि विकनेसही आहे. तो माझा कंफर्ट झोन आहे. पण तो कधीकधी माझा विकनेस होऊ शकतो कारण एखाद्या टास्कमध्ये त्याला काही दुखापत झाली तर मला ते पाहवणार नाही. किंवा कोणी जर त्याला दुखवायचा प्रयत्न केला तर ते मला आवडणार नाही. अरबाजचंही माझ्याबाबतीत असंच होईल. आम्ही एकमेकांशी खूप जोडलेले आहोत. हा शो फक्त शारिरीक पातळीवर खेळायचा नाहीये तर इथे भावनिकरित्याही एकमेकांचा विश्वासघात केला जाईल. इमोशन ब्रेकडाउन होईल."

ती पुढे म्हणाली, "अरबाजच्या विरोधात खेळायला नको म्हणून मी आधी शो ला नकार देणार होते. पण आपलं मन सतत बदलत राहतं. माझंही तेच झालं. सध्या मी अरबाजच्या विरोधात खेळायचा विचार करत नाहीये पण जर अशी परिस्थिती आलीच तर आम्ही दोघंही एकमेकांचा आदर ठेवून तगडी स्पर्धा करु. आपल्या पार्टनरसोबत हेल्दी स्पर्धा असणं चांगलंच आहे तरच त्याचं तुमच्या आयुष्यात काहीतरी अस्तित्व आहे असं म्हणता येईल."

अरबाजशी लग्नाबद्दल निक्की म्हणाली, "सध्या तरी आमचा लग्नाचा काही प्लॅन नाही. जोपर्यंत मी आणि अरबाज एखादा रिएलिटी  शो जिंकत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी आता बेस्ट काहीतरी होईल अशी आशा करते."

Web Title : निक्की तंबोली: रियलिटी शो जीतने के बाद ही अरबाज से शादी।

Web Summary : निक्की तंबोली ने स्पष्ट किया कि वह अरबाज पटेल से रियलिटी शो जीतने के बाद ही शादी करेंगी। वे 'THE 50' में प्रतिस्पर्धा कर रहे हैं, व्यक्तिगत बंधन को कड़ी प्रतिस्पर्धा और संभावित भावनात्मक विश्वासघात के साथ संतुलित कर रहे हैं।

Web Title : Nikki Tamboli: Marriage with Arbaaz only after winning reality show.

Web Summary : Nikki Tamboli clarifies she'll marry Arbaaz Patel after winning a reality show together. They're competing in 'THE 50,' balancing personal bond with fierce competition and potential emotional betrayal.