'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधल्या सोनूचा बिकिनी लूक, पण सोशल मीडियावर झाली तुफान ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:58 IST2025-11-02T14:56:10+5:302025-11-02T14:58:17+5:30
निधी भानुशाली कुटुंबासोबत गोवा येथे एन्जॉय करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधल्या सोनूचा बिकिनी लूक, पण सोशल मीडियावर झाली तुफान ट्रोल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' लोकप्रिय मालिकेत सोनू च्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री निधी भानुशाली चर्चेत आहे. निधी कायम फॅशनेबल लूकमध्ये दिसते. सध्या ती कुटुंबासोबत व्हेकेशन एन्ज़य करत आहे. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन ती ट्रोल होत आहे. वडील आणि भावासमोर निधी बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. यावरुन तिला नेटकऱ्यांनी टार्गेट केलं आहे.
निधी भानुशाली कुटुंबासोबत गोवा येथे एन्जॉय करत आहे. तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्यासोबत तिचे आई वडील आणि भाऊ आहे. चोघंही क्वॉलिटी टाईम घालवत आहेत. एका फोटोत तिचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये आहे. तर काही फोटोंमध्ये ती निळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन पूलमध्ये वेळ घालवत आहे. तिच्या आईने देखील स्विमसूट परिधान केला आहे. निधीच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
निधी भानुशालीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो भलतेच आवडले आहेत. निधीच्या लूकची ते स्तुतीही करत आहेत. तर दुसरीकडे ट्रोलर्सने मात्र तिला चांगलंच सुनावलं आहे. 'बिचाऱ्या वडील आणि भावाला काय पाहावं लागत आहे','आईलाही काही लाज नाही' अशा विचित्र कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत.
निधी भानुशालीने २००८ मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा'शोमध्ये एन्ट्री घेतली होती. मात्र गेल्या वर्षीच तिने हा शो सोडला.